Sachin-Tendulkar Sakal
क्रीडा

ट्रॅफिक पोलिसवाल्यानं मित्राचा जीव वाचवला; सचिनची भावूक पोस्ट

सुशांत जाधव

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) ने पुन्हा एकदा आपल्यातील वेगळेपण दाखवून दिले आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या जीवलग मित्राच्या मदतीला धावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे त्याने खास आभार मानले आहेत. आल्या मित्राच्या मदतीला धावून येणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याची सचिन तेंडुलकरने भेट घेतली. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील किस्सा शेअर केलाय. त्याने ही गोष्ट सांगताना खास कॅप्शनही दिल्याचे पाहायाला मिळतं.

ट्विटरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरने ही गोष्ट शेअर केलीये. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय की, 'काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या मित्राचा अपघात झाला होता. परमेश्वराच्या कृपेनं आता तो बरा आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने तात्काळ मदत केली. यामुळेच माझ्या मित्राचा जीव वाचला. संबंधित पोलिसाने अपघातातील तीव्रता ओळखून मित्राला रिक्षातून रुग्णालयात दाखल केले.

मित्राच्या मदतीला धावून त्याचे प्राण वाचवलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची भेट घेतली. प्रत्येक्षात भेटून त्याचे आभार मानले. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत. कर्तव्याच्या पलिकडे जाऊन ते लोकांची मदत करत असतात. अशा लोकांमुळेच जग सुंदर वाटते, असे मास्टर ब्लास्टर सचिनने म्हटले आहे. एवढेच नाही तर या पोस्टमध्ये त्याने लोकांनी वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT