SachinTendulkar : जगातील महान फलंदाजांपैकी एक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी खेळपट्टीवर असे काही क्षण आले ज्याने तो भावूक झाला. 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर सचिन भावूक झाला होता. मास्टर ब्लास्टरने जवळपास 24 वर्षात अनेक विक्रम आपल्या नावावर केले, जे आता मोडणे फार कठीण आहे. सचिन आपले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतो, जे लोकही आवडीने ऐकतात. असाच एक किस्सा सचिनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका मैदानाची गोष्ट सांगत आहे.
सचिन या व्हिडिओमध्ये म्हणाला की, मी पीवायसी क्लबच्या मैदानात उभा आहे. येथे मी 1986 मध्ये माझा पहिला अंडर-15 सामना खेळला होता. त्या सामन्यात मी नॉन स्ट्रायकर एंडवर उभा होतो. माझ्याच शाळेतील मित्र राहुल हा स्ट्रायकर होता. त्याने ऑफला शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी धावतो. तिसरी धाव घेण्यासाठी त्याने माझ्यावर दबाव आणला. मला त्याची वेगवान धावण्याची क्षमता माहित होती, पण पुढे धावण्याचे धाडस माझ्यात नव्हते. त्याच्या सांगण्यावरून मी पळालो पण धावबाद झालो. खेळपट्टीवरून पॅव्हेलियनमध्ये जाताणा रडत रडत गेलो. यानंतर काही वरिष्ठ खेळाडू आणि मुंबई संघाचे व्यवस्थापक अब्दुल इस्माईल यांनी मला समजावून सांगितले. आता मी 35 वर्षांनी या मैदानावर परतलो आहे आणि हे मैदान पाहून मी भावूक झालो.
सचिनने आपल्या कारकिर्दीत 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने कसोटीत 53.79 च्या सरासरीने 15,921 धावा, एकदिवसीय सामन्यात 44.83 च्या सरासरीने 18,426 धावा आणि एका T20 मध्ये 10 धावा केल्या.
सचिनने याशिवाय कसोटीत 46, एकदिवसीय सामन्यात 154 विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी एकमेव टी-20 मध्ये त्याने एक विकेटही घेतली होती. याशिवाय सचिनने 78 आयपीएल सामनेही खेळले, ज्यात त्याने 119.82 च्या स्ट्राइक रेटने 2334 धावा केल्या. सचिनच्या नावावर कसोटीत 51 शतके आणि 68 अर्धशतके आहेत. त्याचबरोबर सचिनच्या नावावर वनडेमध्ये 49 शतके आणि 96 अर्धशतके आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.