sachin tendulkar twitter ross taylor sakal
क्रीडा

सचिनभाई बहोत शुक्रिया! रॉस टेलरने हिंदीत ट्वीट करत जिंकली चाहत्यांची मनं

तेंडुलकरने टेलरला ट्विट करुन त्याच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या

Kiran Mahanavar

न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने सोमवारी (४ एप्रिल) १६ वर्षे खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर टेलरचे त्याच्या या शानदार कारकिर्दीबद्दल अनेक दिग्गजांनी कौतुक केले. या यादीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावाचाही समावेश आहे. तेंडुलकरने टेलरला ट्विट करुन त्याच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

मात्र, टेलरने तेंडुलकरच्या कौतुकास्पद ट्विटला हिंदीत उत्तर देऊन भारतीयांना सुखद धक्का दिला. सचिनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पहिले ट्विट केले आणि लिहिले, "रॉस, तू खेळाचा महान राजदूत होतास! तुझ्याविरुद्ध खेळणे सुंदर अनुभव होता. ज्या पद्धतीने तू स्वत:ला वर्षांनुवर्ष पुन्हा शोधून काढलेस ती गोष्ट क्रिकेटपटू बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्व लहान मुलांसाठी एक प्रेरणा आहेत. अप्रतिम कारकिर्दीबद्दल हार्दिक अभिनंदन."

सचिनच्या या ट्विटनंतर रॉस टेलरने हिंदीत ट्विट करुन त्यााला रिप्लाय दिला. टेलरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "धन्यवाद सचिन भाई, तुमच्या कौतुकासाठी. माझ्या आवडत्या खेळाडूकडून हा संदेश मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे."

38 वर्षीय रॉस टेलरने न्यूझीलंडसाठी त्याचा शेवटचा सामना म्हणून 4 एप्रिल रोजी मिल्टनमधील सेडन पार्क येथे नेदरलँड्सविरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता. राईट हॅन्ड बॅट्समन अशी ओळख असलेल्या रॉसने त्याच्या शेवटच्या सामन्यात मात्र केवळ 14 धावा केल्या होत्या. टेलरच्या या निरोपाच्या सामन्यात न्युझीलंडने मात्र 115 धावांनी शानदार विजय मिळवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT