Sachin Tendulkar Will Lead India Legends In Road Safety World Series 2022  esakal
क्रीडा

'तेंडुलकर' कॅप्टन्सीचं पर्व पुन्हा अवतरणार; असं आहे Road Safety World Series चं वेळापत्रक

अनिरुद्ध संकपाळ

Sachin Tendulkar : भारताचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (Road Safety World Series) च्या दुसऱ्या हंगामासाठी इंडिया लेजंड्स संघाचे नेतृत्व करणार आहे. इंडिया लेजंड्स गेल्यावेळच्या सिरीजचे विजेते आहेत. आयोजकांनी याबाबतची घोषणा आज केली. ही स्पर्धात 10 सप्टेंबर पासून सुरू होईल ती पुढे 22 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी खेळवली जाईल. स्पर्धेचा पहिला सामना हा कानपूरमध्ये होणार आहे. तर रायपूरमध्ये दोन्ही सेमी फायनल आणि फायनल खेळवल्या जाणार आहेत. (Road Safety World Series 2022 Schedule Date Venue)

आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार या स्पर्धेतील इतर सामने हे इंदौर आणि डेहराडून येथे खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंडची लिजेंड्स टीम देखील सहभागी होणार आहे. भारतात आणि जगभरात रस्ते सुरक्षा जनजागृती निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्येश आहे. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंड हे संघ देखील सहभागी होणार आहेत. या स्पर्धेला भारत सरकारचे वाहतूक, माहिती तसेच प्रसारण, युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाचे समर्थन प्राप्त आहे.

या स्पर्धेबाबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 'मला पूर्ण विश्वास आहे की रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज सामाजिक बदल घडवण्यात महत्वाची भुमिका बजावेलरस्ते आणि रस्ते सुरक्षा यांच्याविषयी लोकांचा दृष्टीकोण बदलण्यासाठी हे एक व्यासपीठ म्हणून काम करेल.'

दरम्यान, रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 'रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता आणण्याचा हा उपक्रम खूप चांगला आहे. आम्हाला देशातील सर्व व्यक्ती रस्ते आणि महामार्गांबाबतच्या सर्व नियमांबद्दल जागरूक असावेच असे वाटते. त्यांनी या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी लागले. मला विश्वास आहे की ही मालिका यामध्ये महत्वाची भुमिका बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्सची खेळपट्टी कशी आहे? टीम इंडियाच्या कोच म्हणाला, जसप्रीत बुमराह तर यावर...

Latest Maharashtra News Updates : 30 महिला अधिकाऱ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई

Manchar Crime : अपघात प्रकरणी खोटा दावा करून विमा रक्कम मिळवण्याचा प्रयत्न; चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मुंबईचं नवं आकर्षण, वॉकिंग प्लाझाचं ४० टक्के काम पूर्ण; कधी होणार खुला?

Iran–Israel war: इराणवरील हल्ल्यात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; सरकारने दिली सर्व माहिती

SCROLL FOR NEXT