SAFF Championship eSakal
क्रीडा

SAFF Championship : मैदानातच भिडले भारत आणि नेपाळचे फुटबॉलपटू; व्हिडिओ व्हायरल

यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध सामन्यातही असा वाद पहायला मिळाला होता.

Sudesh

सैफ चॅम्पियनशिपमधील भारत विरुद्ध नेपाळ हा सामना शनिवारी पार पडला. या सामन्यात भारताने नेपाळवर २-० ने विजय मिळवला. मात्र या निकालापेक्षा जास्त चर्चा झाली, ती सामन्यादरम्यान झालेल्या वादाची. सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला भारत आणि नेपाळचे खेळाडू एकमेकांशी मैदानातच भिडले होते.

या सामन्यात भारताच्या सुनील छेत्री आणि महेश सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केले. नेपाळला मात्र एकही गोल करता आला नाही. छेत्री याने सामन्याच्या ६१ व्या मिनिटाला गोल केला होता. त्यानंतर काही वेळातच मैदानावर मोठा वाद झाला. यानंतर झालेल्या झटापटीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेमकं काय घडलं?

सामन्याच्या ६४ व्या मिनिटाला भारताचा राहुल भेके आणि नेपाळचा बिमल मागर एक हेडर मारण्यासाठी पुढे आले. यावेळी हे दोघेही एकमेकांना धडकले. याची परिणीती वादात झाली, आणि त्यांच्यात धक्काबुक्कीही सुरू झाली. यानंतर दोन्ही संघांमधील इतर खेळाडूंनीही या वादात उडी घेतली.

भारताचा दुसरा विजय

दरम्यान, या चॅम्पियनशिपमध्ये भारताने आपला सलग दुसरा विजय मिळवला आहे. यापूर्वी बुधवारी भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. यावेळी भारताने पाकिस्तानवर ४-० असा विजय मिळवला होता. या सामन्यातही खेळाडूंमध्ये झटापट झालेली पहायला मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT