SAFF Championship India Vs Pakistan esakal
क्रीडा

SAFF Championship India Vs Pakistan : एकटा छेत्रीच बास! पहिल्याच हाफमध्ये पाकिस्तानची दयनीय अवस्था

अनिरुद्ध संकपाळ

SAFF Championship India Vs Pakistan : एसएएफएफ चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने पहिल्याच सामन्यातील पहिल्या हाफमध्येच आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची अवस्था दयनीय केली. भारतीय संघाचा स्टार फुटबॉलर सुनिल छेत्रीने अवघ्या 15 मिनिटात पाकिस्तानवर दोन गोलं केले. भारतीय संघाने पहिल्या हाफमध्ये बॉलवरील ताबा, पासेस आणि गोलपोस्टवर आक्रमण करण्यात आघाडी घेतली. पाकिस्तानला मात्र पहिल्या हाफमध्ये बॉलवर ताबा मिळवण्यात अपयश आले.

सामन्याला सुरूवात झाल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या गोलपोस्टवर त्वेशाने आक्रमण केले. सुनिल छेत्रीने 10 व्या मिनिटालाच गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर भारताने बॉल पाकिस्तानच्या गोलपोस्टजवळच ठेवला. भारतीय स्ट्रायकर्सनी सातत्याने पाकिस्तानच्या गोलपोस्टवर चढाया केल्या. दरम्यान, 16 व्या मिनिटाला सुनिल छेत्रीला पेनाल्टी मारण्याची संधी मिळाली. ही संधी छेत्रीने वाया न घालवता भारताचा आणि स्वतःचा देखील दुसरा गोल केला.

यानंतर भारतीय संघाने संपूर्ण पहिला हाफ बॉलवरचा आपला ताबा कायम ठेवला. भारताने या 45 मिनिटात पाकिस्तानच्या गोलपोस्टवर 12 वेळा चढाया केल्या. यातील 4 शॉट्स ऑन टार्गेट होते. तर 74 टक्के बॉल भारताच्या ताब्यात होता. भारताने तब्बल 237 पासेस दिले. यात 87 टक्के अचुकता होती.

दुसरीकडे पाकिस्तानला संपूर्ण पहिल्या हाफमध्ये 3 शॉट्सच मारण्याची संधी मिळाली. यातील एकही शॉट ऑन टार्गेट नव्हता. तर पहिल्या हाफमध्ये 25 टक्केच बॉलवर ताबा मिळवता आला. पास करण्याच्या बाबतीत देखील पाकिस्तानने कच खाल्ली. त्यांनी पहिल्या हाफमध्ये 84 पासेस दिले. त्यात फक्त 55 टक्के अचुकता होती. विशेष म्हणजे पहिल्या हाफमध्येच पाकिस्तानला दोन पिवळे कार्ड दाखवण्यात आले. इतका धसमुसळा खेळ त्यांनी केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT