Sushil Kumar  google
क्रीडा

ऑलिम्पिकपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट

सुशील कुमार सागरला मारहाण करताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सुशांत जाधव

Sagar Rana Murder Case : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) याच्याविरोधात अजामीपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पैलवान सागर राणा हत्या प्रकरणी (Sagar Rana Murder ) यापूर्वी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटात हणामारीचा प्रकार झाला होता. यात सागर राणा या 23 वर्षीय पैलवानाचा मृत्यू झाला. सुशील कुमार सागरला मारहाण करताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Sagar Rana Murder Case Non bailable warrant issued against Olympic medalist Sushil Kumar and others)

4 मे रोजी मध्यरात्री झालेल्या मारहाणीच्या प्रकारापासून सुशील कुमार पसार झालाय. सुशील कुमार उत्तराखंडमधील हरिद्वार येथे लपून बसल्याची चर्चा रंगली होती. पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी राजधानी दिल्लीसह हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये त्याचा शोध घेत आहेत. काही वर्षांपूर्वी छत्रसालची धुरा सांभाळण्यासाठी सुशीलने रेल्वेतील नोकरी सोडली होती आणि त्यानंतर त्याला दिल्लीच्या शिक्षण विभागात नोकरी देण्यात आली. सुशीलची कोंडी करण्यासाठी दिल्ली सरकारने त्याच्या नोकरीबाबत कठोर निर्णय घ्यावा, अशी शिफारस दिल्ली पोलिसांनी केली असल्याचीही चर्चा आहे.

4 मे च्या मध्यरात्री छत्रसाल स्टेडियममध्ये पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. या वादात जखमी झालेला पैलवान सागर BJRM रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परस्थिती अगदीच नाजूक असल्यामुळे त्याला ट्रॉमा सेंटलमध्ये दाखल करण्यात आले. याच ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात कोणत्याही पैलवानाचा हात नाही, असे स्पष्टीकरण सुशील कुमारने दिले. पण या घटनेतील काही व्हिडिओ समोर आले असून सुशील कुमारने सागरला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सागर सुशील कुमारला गुरु मानायचा. सुशीलचे त्याची घरी देखील येणे जाणे होते. दोघांच्यात चांगले संबंध असताना तो सागरसोबत असा कसा वागू शकतो, असे मृत सागरच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

SCROLL FOR NEXT