Saina Nehwal Siddharth Controversy
Saina Nehwal Siddharth Controversy  esakal
क्रीडा

सिद्धार्थच्या स्पष्टीकरणावर सायनाचे वडील भडकले

अनिरुद्ध संकपाळ

हैदराबाद: अभिनेता सिद्धार्थने (Siddharth) बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर (Saina Nehwal) केलेल्या वक्तव्यावरुन मोठे वादळ उठले आहे.सायना नेहवालचे 6 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करणारी पोस्ट केली होती. अभिनेता सिद्धार्थने ही पोस्ट रिपोस्ट करत त्यावर कमेंट केली होती. या कमेंटवरुन वाद सुरु झाला आहे. आता सायना नेहवालच्या वडिलांनीही सिद्धार्थवर टीका करत त्याने सायना नेहवालचा अपमान केल्याचे सांगितले. (Saina Nehwal Father Slams Actor Siddharth Over Subtle cock Statement)

'पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याबाबत जे घडले त्यानंतर सायना नेहवलाने ट्विट करुन चिंता व्यक्त केली होती. त्यावर अभिनेता सिद्धार्थने हीच पोस्ट रिपोस्ट करत प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत वापरलेल्या शब्दप्रयोगावरुन वाद सुरु झाला आहे. दरम्यान, याबाबत सायना नेहवालचे वडील हरवीर सिंह नेहवाल (Saina Nehwal Father) यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, 'मी ही पोस्ट वाचली आहे. सिद्धार्थ जे काही म्हणाला आहे ते योग्य नाही. मला माहीत आहे की सिद्धार्थ दक्षिणेतील मोठा अभिनेता आहे. त्याने सायनाबद्दल चुकीचे शब्द वापरले. त्याने असे अपमानजनक शब्द वापरणे चांगले नाही.' (Saina Nehwal Siddharth Controversy)

हरवीर सिंह नेहवाल (Harvir Singh Nehwal) यांना सांगितले की, 'मा फोनवर सायनाशी बोललो. ती म्हणाली की जे काही तिच्याबद्दल लिहिले गेले आहे ते तिला आवडलेले नाही. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगासारख्या इतर संघटनाही सायनाच्या समर्थनात पुढे आल्या आहेत. एका सद्गृहस्थाकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती.'

सिद्धार्थच्या (Siddharth) वक्तव्यावर निराशा व्यक्त करत हरवीर सिंह पुढे म्हणाले, 'आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो अभिनेत्याने या बाबत माफी मागितली पाहिजे. जरी त्याने ते जाणीवपूर्वक केले असो वा नसो त्याने माफी मागितली पाहिजेच. एका महिलेबाबत असे शब्द वापरणे चांगले नाही.'

पंजाबमधील भटिंडामध्ये पंतप्रधानांचा (Prime Minister Of India) ताफा फ्लाय ओव्हरवर 15 ते 20 मिनिट अडकून पडला होता. पुढे रस्ता शेतकरी आंदोलकांनी अडवून ठेवला होता. या बाबत सायनाने 'जर एखाद्या देशाच्या पंतप्रधानांची सुरक्षाच धोक्यात असले तर आपण देश सुरक्षित असल्याचा दावा करु शकत नाही.अराजकता पसरवणाऱ्यांनी पंतप्रधानांवर केलेल्या हल्ल्याचा मी कडक शब्दात निषेध करते.' असे ट्विट केले होते.

या ट्विटला अभिनेता सिद्धार्थने, 'सबटल कॉकची (Subtle cock) जागतिक विजेती.. परमेश्वराचा आभार की देशाचे रक्षण करणारे अजून आहेत. रिहाना तुला लाज वाटली पाहिजे.' असे खोचक ट्विट केले होते. यात जो स्बटल कॉकचा अर्थ अनेकांनी लैंगितेशी जोडत सिद्धार्थवर टीका केली. (Siddharth give derogatory statements against Saina Nehwal)

राष्ट्रीय महिला आयोगाने (NWC) आपल्या वक्तव्यात म्हटले की, हा अभिनेता स्त्रीयांची घृणा करणारा आणि त्यांचा द्वेश करणारा आहे. त्याने सोशल मीडियावर महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचले असे वक्तव्य केले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता सिद्धार्थने आपली बाजू मांडताना सांगितले की, 'सबटल कॉक (Subtle cock) हा शब्दप्रयोग कोणाचाही अपमान करण्यासाठी वापरण्यात आलेला नाही. कॉक आणि बूल (cock and Bull) असा याचा संदर्भ आहे. याचा अर्थ एखाद्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नये असा होतो.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT