Sajan Bhanwala became the first Indian Greco Roman wrestler to win a medal at the Under-23 World Championship  esakal
क्रीडा

Sajan Bhanwala : कुस्तीपटू साजन भानवालाने रचला इतिहास! 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Sajan Bhanwala : भारताच्या साजन भानवालाने स्पेनमध्ये सुरू असलेल्या 23 वर्षाखालील ग्रिको रोमन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. साजन भानवाला हा 23 वर्षाखालील ग्रिको रोमन कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. त्याने युक्रेनच्या दिमेत्रो व्हासेट्स्कीचा पराभव करत कांस्य पदक पटकावले.

युक्रेनचा कुस्तीपटू दिमेत्रीने साजनला मॅटच्या सर्कलबाहेर काढत चार गुण मिळवून दमदार सुरूवात केली. मात्र भानवालाने जबदस्त पुनरागमन करत प्रतिस्पर्ध्यावर चांगली पकड निर्माण केली. त्याने 4 गुण मिळवत बरोबरी साधली. भानवालाने सामन्यात सकारात्मक खेळ करत पार तेरे डाव टाकला आणि युक्रेनच्या प्रतिस्पर्ध्याविरूद्ध अजून 4 गुणांची कमाई केली. मात्र युक्रेनच्या दिमेत्रीने पुन्हा एकदा मुसंडी मारत 10 - 4 अशी आघाडी घेतली. दरम्यान, भानवालाने ही आघाडी कमी करत 10 - 10 अशी बरोबरी साधली. ही लढत 10 - 10 अशी बरोबरीत संपली. मात्र साजन भानवालाला क्रायटेरियाच्या जोरावर विजेता घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT