sajan prakash Twitter
क्रीडा

साजन चला टोकियो! ऐतिहासिक कामगिरीसह मिळवले ऑलिम्पिकचे तिकीट

27 वर्षीय साजनची याआधी 2016 रिओ ऑलिम्पिकसाठीची पात्रता अवघ्या 0.1 सेकंदाच्या फरकाने हुकली होती.

सुशांत जाधव

इटलीतील रोम येथे सुरु असलेल्या स्विमिंग स्पर्धेत भारतीय जलतरणपटू साजन प्रकाश याने नवा इतिहास रचलाय. त्याने बटरप्लाय प्रकारात 200 मीटर अंतर अवघ्या 1 मिनिट 56:38 सेकंदात पार केले. या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. भारताकडून ऑलिम्पिकसाठी 'ए' स्टँडर्ड पात्र ठरलेला तो पहिलाच जलतरणपटू ठरलाय. आतापर्यंत भारताच्या अनेक जलतरणपटूंनी ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता. परंतु कोणालाही ए क्वालिफिकेशन मार्कसह थेट पात्रता सिद्ध करता आली नव्हती. (Sajan Prakash Record Becomes First Ever Indian Swimmer To Make Olympic Create New History)

27 वर्षीय साजन याआधी 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली होती. मात्र यावेळी 'ए' स्टँडर्डमध्ये पात्र ठरण्यास तो अवघ्या 0.1 सेकंदाने कमी पडला होता. केरळच्या या जलतरणपटूने हार न मानत कठोर परिश्रम घेत अखेर 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात थेट पात्रता सिद्ध करुन ऑलिम्पिकची यंदाची वारी पक्की केलीये. केरळचा हा जलतरणपटू सातत्याने कामगिरीत सुधारणा करताना दिसतोय. मागील आठवड्यात त्याने बेलग्रेड स्पर्धेत 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1 मिनट 56.96 सेकंदाची वेळ नोंदवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT