Sakshi Malik Warning for Protest sakal
क्रीडा

Wrestlers protest : कुस्तीपटूचा वाद पुन्हा पेटला! 'बृजभूषण यांच्या गटाला डच्चू द्या अन्यथा...' साक्षी मलिकचा सरकारला इशारा

Sakshi Malik Warning for Protest : जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेवरील निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भारतातील कुस्ती या खेळाशी संबंधित वाद पुन्हा उफाळून आला.

Kiran Mahanavar

Sakshi Malik Warning for Protest : जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेवरील निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे भारतातील कुस्ती या खेळाशी संबंधित वाद पुन्हा उफाळून आला.

साक्षी मलिक, बजरंग पुनिया या ऑलिंपिक पदकविजेत्या कुस्तीपटूंनी स्पष्ट अन्‌ परखड मत व्यक्त करताना म्हटले की, भारतीय कुस्ती संघटनेच्या नव्या कार्यकारिणीचे अध्यक्ष संजय सिंह यांनी निलंबन मागे घेण्यासाठी कुटील पद्धतीचा वापर केला आहे. बृजभूषण सिंह यांच्या गटातील प्रत्येक व्यक्तीला संघटनेपासून कायमस्वरूपी दूर करा, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करू, असा इशारा साक्षी मलिक हिने पुढे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला दिला आहे.

साक्षी मलिक हिने सोशल माध्यमावर आपले मत व्यक्त करताना सांगितले की, संजय सिंह यांनी जागतिक कुस्ती संघटनेसोबत हातमिळवणी केली. त्यामुळेच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आम्हाला मंगळवारी माहिती मिळाली. बृजभूषण सिंह व संजय सिंह या दोघांनीही आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

सरकारच्या सूचनांचे पालन केले नाही

भारतातील कुस्ती या खेळाशी संबंधित पदावर बृजभूषण सिंह किंवा त्यांच्या कुटुंबीयामधील एकही व्यक्ती असणार नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. केंद्र सरकारकडूनही याबाबत सूचना करण्यात आली होती, पण दोन ते तीन दिवसांपूर्वीच बृजभूषण यांचा मुलगा उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. याचा अर्थ त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूचनांचेही पालन केले नाही, अशी खंत बजरंग पुनिया याच्याकडून व्यक्त करण्यात आली.

लवकरच पाऊल उचलू : अनुराग ठाकूर

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना कुस्ती संघटनेतील या नव्या घडामोडीबाबत विचारले असता ते म्हणाले, या प्रकरणाबाबत विचार सुरू आहे आणि चौकशीही करत आहोत यावर कोणता निर्णय घ्यायचा किंवा कोणते पाऊल उचलायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

"मी कुस्ती या खेळामधून निवृत्ती स्वीकारली असली तरी बृजभूषण सिंह आणि त्याच्या गटाला संघटनेत काम करू देणार नाही. महिलांवरील अत्याचार होऊ देणार नाही. पुढील दोन ते चार दिवसांमध्ये आमच्याकडून कोणते पाऊल उचलण्यात येईल याबाबत स्पष्टता मिळेल."

- साक्षी मलिक, ऑलिंपिक पदकविजेती कुस्तीपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT