Sakshi Dhoni Sakal
क्रीडा

साक्षी धोनीनं शेअर केली क्रिकेटर्सच्या बायकांची 'अनटोल्ड स्टोरी'

एका क्रिकेटर सोबत लग्न केल्यानंतर कसा बदल होतो यावर साक्षी धोनीनं मनमोकळ्या गप्पा मारल्या

सकाळ वृत्तसेवा

IPL: प्रत्येक खेळाडूंची लाइफ अन्य व्यक्तीपेक्षा खूप वेगळी असते. एखादा खेळाडू जर चांगल्या प्रकारे खेळ दाखवू शकला नाही तर त्याच्या कुटुंबियांवरही याचा परिणाम होत असतो. या विषयावर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीने खुलासा केला आहे. महेद्रसिंह धोनी आणि साक्षी यांचा विवाह 2010 मध्ये झाला. लग्नानंतर या जोडीची चर्चा खूप जास्त झालेली पाहायला मिळाली होती. काही वेळा याचा फायदा झाला तर काही वेळा यामुळे नुकसान ही झाले आहे.

इंडियन प्रिमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. या चेन्नई संघाचा कर्णधार धोनी आहे. चेन्नई फ्रँचायझीच्या खास कार्यक्रमात साक्षीनं प्रोफेशनल क्रिकेटरच्या पत्नीला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो यावर भाष्य केले आहे. लग्नानंतर सर्व महिलांचे आयुष्य बदलत असते. इतर महिलांचे पती ऑफिसला जातात, आमचे पती खेळायला जातात. त्यांच्या वर कोणताही दबाव येणार नाही यासाठी आम्हाला बदलावे लागते.

क्रिकेटर सोबत लग्नानंतर सामान्य आयुष्य संपते. प्रायव्हेट स्पेस राहत नाही. चोहू बाजूनं कॅमेरे असतात. कोणतीही गोष्ट केली तर ती लगेच लोकांसमोर येत असते. यामुळे सर्वत्र चर्चा सुरू होत असतात. खूप प्रश्न निर्माण होतात. मित्रा सोबत जरी वेळ घालवला तरी याची चर्चा होते. असे साक्षी धोनीने सांगितले आहे. तिने सांगितलेली अनटोल्ड स्टोरी सर्व क्रिकेटर्स आणि त्यांच्या पत्नींना लागू होणारी अशीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT