salim durani death cricketer famous for hitting sixes on demand salim durani career  
क्रीडा

Salim Durani Death : युवराज अन् धोनीच्या आधीचा 'सिक्सर किंग'; ऑन डिमांड मारायचा षटकार

रोहित कणसे

Salim Durani Death : भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, मात्र आज (२ एप्रिल) रोजी प्रेक्षकांच्या ऑन डिमांड षटकार ठोकणारे १९६० च्या दशकातील दिग्गज क्रिकेटकर सलीम दुर्रानी यांची निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी बॉलिवुडमध्ये प्रवीन बाबी यांच्यासोबत देखील काम केलं होतं.

सलीम दुर्रानी यांच्या निधनाबद्दल क्रिकेट जगताशी निगडित अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या काळातील भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू मानला जाणारे सलीम दुर्रानी यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते प्रेक्षकांच्या मागणीवरून षटकार मारायचे.

सलीम दुर्रानी हे त्यांचे लहान भाऊ जाहांगीर दुर्रानी यांच्यासोबतच गुजरातच्या जामनगर येथे राहात होते. त्यांचे पायाचे हाड मोडल्याने त्यांच्यावर यावर्षी जानेवारीत ऑपरेशन देखील झाले होते. आफगाणीस्तानची राजधानी काबूल येथे जन्मलेल्या दुर्रानी यांना त्यांच्या धाकड फलंदाजीसाठी ओळखले जाते. तसेच ते डावखुरे स्पिन गोलंदाज देखील होते. त्यांनी २९ कसोटी सामने खेळले आहेत.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

सलीम दुर्रानी यांचं करियर

सलीम दुर्रानी यांनी १९६१-६२ मध्ये पांच सामन्यांच्या टेस्ट मालिकेत इंग्लड विरोधात भारताच्या ऐतिहासिक २-० ने मिळवलेल्या विजयात त्यांच्या महत्वाची भूमिका होी. त्यांनी कोलकात आणि मद्रास मध्ये आठ आणि १० विकेट घेतले होते.

दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताने विजय मिळवला होता. दुर्रानी त्यांच्या खास ड्रेसिंग स्टाइलसाठी देखील ओळखले जात होते. त्यांनी भारतातसाठी ५० डावांमध्ये एक शतक आणि सात अर्धशतक ठोकले आणि त्यांच्या नावावर १२०२ धावा आहेत.

इंग्लड विरोधात ऐतिहासिक विजयानंतर तब्बल एका दशकानंतर सलीम दुर्रानी आंनी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्टइंडीज विरोधात क्लाइव लॉड आणि गारफील्स सोबर्स यांना आऊट करत भारताला विजय मिळवून दिला होता. तसेच या स्टार क्रिकेटरने प्रसिद्ध अभिनेत्री प्रवीन बाबी यांच्या सोबत अभिनय करत बॉलिवुडमध्ये देखील काम केलं होतं.

काबूलमध्ये जन्मलेल्या सलीम दुर्रानी यांनी १ जानेवारी १९६० रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. दुर्रानी यांनी जवळपास १३ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळले आहे. ते असे फलंदाज होते जे चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार ठोकत. याशिवाय सलीमने गोलंदाजीतही नाव कमावले. सलीम दुर्रानी यांनी केवळ कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी शेवटची कसोटी ६ फेब्रुवारी १९७३ रोजी इंग्लंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT