Sania Mirza Martina Hingis 
क्रीडा

सानिया-मार्टिनाची उपांत्य फेरीत धडक

वृत्तसंस्था

सिंगापूर : भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी मोसमाच्या अखेरच्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शुक्रवारी त्यांनी तैवानच्या हाओ चिंग चान-युंग यान चॅन जोडीचे आव्हान 7-6(12-10), 7-5 असे परतवून लावले. या वर्षी जुलैमध्ये सानिया-मार्टिना जोडी फुटली होती. त्यानंतर प्रथमच त्या एकत्र खेळत होत्या.

उपांत्य फेरीत आता त्यांची गाठ अव्वल मानांकित कॅरोलिन गार्सिया-क्रिस्तिना म्लाडेनोविच आणि बेथानी माटेक सॅंड्‌स-ल्युसी सॅफारोवा यांच्यातील विजेत्या जोडीशी पडणार आहे.

सानिया आणि मार्टिना यांना पहिल्या सेटमध्ये कडवा प्रतिकार करावा लागला. दोन्ही जोड्यांनी या सेटमध्ये एकही सर्व्हिस गमावली नाही. सेटमध्ये 5-5 अशी बरोबरी असताना अकराव्या गेमला सानिया-मार्टिनाची सर्व्हिस भेदली गेली; पण हाओ-युंग यांना हा आनंद फार काळ अनुभवता आला नाही. सानिया आणि मार्टिना यांनी बाराव्या गेमला ब्रेकची संधी साधली आणि सेट टायब्रेकमध्ये नेला. टायब्रेकमध्येदेखील सानिया-मार्टिना यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तीन सेट पॉइंट वाचवल्यानंतर त्यांना पहिला सेट जिंकता आला.

दुसऱ्या सेटमध्येही सानिया-मार्टिना यांच्या अनुभवाची कसोटी लागली. हा सेटही बरोबरीतच सुरू होता. दहाव्या गेमला सानिया-मार्टिना यांना ब्रेकची संधी मिळाली. ही संधी साधून त्यांनी आपली सर्व्हिस राखत उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video

Amravati Crime : डोक्यावर गोळी झाडून क्यूआरटी जवानाची आत्महत्या; पोलिस आयुक्तालयाच्या बेसमेंटमधील घटनेमुळे खळबळ

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Nagpur News : महिलेच्या पोटातून काढला १३ किलो वजनाचा फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर

SCROLL FOR NEXT