Sania Mirza Retirement
Sania Mirza Retirement  esakal
क्रीडा

Sania Mirza : अखेर ठरलं! सानिया मिर्झा फेब्रुवारीत घेणार मोठा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

Sania Mirza : भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कौटुंबिक कारणांनी कायम चर्चेत राहिली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत तिचं बिनसल्यामुळे ती संसार मोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त येत होते. सानिया मिर्झा शोएब मलिकसोबत रहात नसून ती घटोस्फोट घेणार अशी माहिती तिच्या जवळच्या मित्रांनी देखील दिली होती. मात्र घटस्फोटाच्या वातावरणात सानिया मिर्झाने आपल्या कारकिर्दिविषयी एक मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

सानिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वीच आपण टेनिसमधून निवृत्तीचे संकेत दिले होते. आता सानिया मिर्झाने निवृत्तीसाठीचे ठिकाण आणि वेळही ठरवल्याचे वृत्त येत आहे. सानिया मिर्झा आपली दीर्घ व्यावसायिक टेनिस कारकिर्द फेब्रुवारी महिन्यात दुबईत होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेनंतर संपवणार असल्याचे संकेत दिले. यापूर्वीच तिने 2022 हा हंगाम माझा शेवटचा टेनिस हंगाम असेल असे जाहीर केले होते. दुखापतींमुळे तिने हा निर्णय घेतला होता.

सानिया मिर्झाने wtatennis.com ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी WTA Finals नंतर माझी टेनिस कारकिर्द संपवणार होते. कारण आम्ही WTA Finals मध्ये पोहचणार होतो. मात्र युएस ओपनपूर्वी माझ्या कोपराला दुखापत झाली अन् मला सगळ्या स्पर्धातून माघार घ्यावी लागली.'

सानिया पुढे म्हणाली, 'खरं सांगू तर मी अशी व्यक्ती आहे की मला गोष्टी माझ्या शर्तींवर करायला आवडतात. दुखापत मला निर्णय घ्यायला भाग पाडू शकत नाही. त्यामुळे मी पुन्हा ट्रेनिंग करू लागले. आता मी दुबई WTA 1000 नंतर निवृत्ती घेईन असा माझा प्लॅन आहे.

महिला दुहेरीत सानिया मिर्झा कझाकिस्तानच्या अॅना डॅनिलिनासोबत खेळते. ही जोडी आता ऑस्ट्रेलियन ओपन 2023 मध्ये कोर्टवर उतरेल. ही स्पर्धा 16 जानेवारीपासून सुरू होत आहे. सानिया मिर्झाने आपल्या कारकिर्दित दोन ऑस्ट्रेलियान ओपन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.

तिने महिला दुहेरीत मार्टिना हिंगिससोबत 2016 मध्ये तर मिश्र दुहेरीत महेश भुपतीसोबत 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनवर आपले नाव कोरले होते. 2022 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सानिया आणि नादिया किचेनोक महिला दुहेरीच्या पहिल्याच फेरीत गारद झाले होते. तर मिश्र दुहेरीत तिने राजीव रामसोबत क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT