ayesha omar esakal
क्रीडा

Sania Mirza: कोण आहे सानियाची स्विमिंगपूलवाली पाकिस्तानी सवत?

पाकिस्तानी क्रिकेटर आणि सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने एक फोटोशूट केलं होतं ज्यामुळे घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या येत आहे. सानिया मिर्झाने सतत अशा काही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या घटस्फोच्या चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेत बहुचर्चित अभिनेत्री आणि मॉडेल आएशा उमरची चर्चा रंगली आहे. (Sania Mirza Shoaib Malik divorce who is ayesha omar krida news)

गेल्या काही महिन्यांपासून आएशा आणि शोएबला बऱ्याच ठिकाणांवर एकत्र पाहिलं गेलंय. इतकंच नव्हे, तर त्यांनी एका मासिकासाठी केलेल्या बोल्ड फोटोशूटमधील काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

फोटोंमध्ये या दोघांचीची केमिस्ट्री पाहता हे नातं नेमकं कोणत्या वळणावर जातंय? हाच प्रश्न पाहणाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दोघांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती नाही. पण कोण आहे? ही पाकिस्तानी अभिनेत्री जी सानिया मिर्झाच्या नवऱ्यासोबत होतीय चर्चा. असा सवाल उपस्थित होत आहे.

कोण आहे आयेशा?

१२ ऑक्टोबर १९८१ रोजी लाहोर, पाकिस्तान येथे जन्मलेली आयशा उमर ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला पाहिल्यानंतर तुम्हाला जर हा चेहरा ओळखीचा वाटत असेल, तर तुम्ही बरोबर आहात. आपण सर्वांनी आयशाला 'जिंदगी गुलजार है' या लोकप्रिय पाकिस्तानी मालिकेत पाहिले होते.

आयशा उमर एक वर्षाची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. ती आणि तिच्या भावाला आईने एकटीनेच वाढवलं. आयशाला एक भाऊ देखील आहे.

आयशाने नॅशनल स्कूल ऑफ बॅचलर्स आणि मास्टर्सची पदवी घेतली आहे. ती शाळा-कॉलेजपासून नाटकात काम करु लागली होती.

सुरुवातील आयशाने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने असंख्य जाहिरातीत काम केलंय. लैंगिक शोषणाचाही आयशाला सामना करावा लागला होता. हीच गोष्ट 2020 साली तिने एका पाकिस्तानी कार्यक्रमातच सांगितली होती.

फक्त पाकिस्तानी मालिकाच नाही, तर पाकिस्तानी सिनेमांमध्येही तिने काम केलंय. लव मे हम आणि मैं हू शाहिद अफरीदी या सिनेमातील आयटम नंबरही परफॉर्म केला आहे. हे दोन्ही सिनेमा हिटही झाले होते. शिवाय 2018 साली न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये आयशाने पाकिस्तानच प्रतिनिधित्व केलं होतं.

नोव्हेंबर 2021 साली पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने एक फोटोशूट केलं होतं. एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट करण्यात आलं. या फोटोशूटवेळीच त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT