Sania Mirza Shoaib Malik Separation esakal
क्रीडा

Sania Mirza : सानिया शोएबची नाही पहिली पत्नी; 'तलाक'ही दिला नसल्याने झाला होता वाद

अनिरुद्ध संकपाळ

Sania Mirza Shoaib Malik Separation : सानिया मिर्झाने गेल्या काही दिवसांपासून केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून शोएब मलिकसोबतचा तिचा 12 वर्षाचा संसार मोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. 12 एप्रिल 2010 मध्ये या दोघांनी हैदराबाद येथे लग्न केले होते. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नावेळी देखील एक मोठा वाद झाला होता. त्यावेळी सानिया मिर्झा ही शोएबची पहिली पत्नी नसल्याचे उजेडात आले होते. सानिया मिर्झापूर्वी शोएब मलिकने आयशा सिद्दीकी सोबत लग्न झाल्याचे आरोप केले होते.

शोएब मलिकची सानिया मिर्झा ही पहिली पत्नी नाही. आयशा सिद्दीकी ही शोएब मलिकची पहिली पत्नी आहे. सानियासोबत लग्न करण्यापूर्वी शोएब मलिकने आयशाला तलाक देखील दिला नव्हता. यामुळे सानिया मिर्झा आणि शोएब यांच्या लग्नावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

आयशा सिद्दीकी ही 2010 मध्ये सानिया - शोएब यांच्या लग्नाआधी माध्यमांसमोर आली होती. त्यावेळी तीने शोएबची पहिली पत्नी असल्याचा दावा केला होता. शोएबने मला तलाक दिल्याशिवाय तो दुसरे लग्न करू शकत नाही असेही ती म्हणाली होती. मी जाड असल्यानेच त्याला मी आवडत नव्हते. असा दावा देखील तिने केला होता. यावेळी शोएबने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तलाकही देणार नाही असे तो म्हणाला होता. मात्र वाद जास्त वाढत गेल्याने त्याने आयशाला तलाक दिला. हा तलाक शोएब आणि सानिया यांच्या लग्नानंतर देण्यात आला होता.

शोएब मलिक हा लग्नापूर्वी सानियाच्या घरी रहात होता. यावरून देखील वाद झाला होता. मुस्लीम धर्मगुरूंनी लग्नापूर्वी नवऱ्याने नवरीच्या घरी राहणे इस्लामच्या विरूद्ध आहे. त्यावेळी सानियाच्या घरच्यांनी शोएबला लग्नाच्या एक दिवस आधी हॉटेलमध्ये थांबवले होते.

यावेळी मीडियामुळे शोएबचे घरातून बाहेर जाणे अवघड झाले होते. मात्र सानियाच्या काकांनी जोरजोरात ओरडत घरात वाद सुरू असल्याचे चित्र निर्माण केले. मीडिया देखील त्यांच्याकडे धावला अन् शोएब तेथून छोट्या गाडीतून सटकला आणि हॉटेल गाठरले. ही गाडी सानियाच्या घरी भाजीपाला आणि सामान आणण्यासाठी वापरली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT