क्रीडा

Sania Mirza: हो...सानिया मिर्झा- शोएबचा घटस्फोट झालाय; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

धनश्री ओतारी

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे. मात्र, दोघेही अधिकृत घोषणेच्या प्रतिक्षेत असल्याचे समजते. (Sania Mirza Shoaib Malik to officially announce divorce )

अनेक दिवसांपासून सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्या मीडियामध्ये चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा घटस्फोट झाला आहे. मात्र, काही शोसाठी सानिया आणि शोएबने करार केले आहेत. या करारांमुळे त्यांनी घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

करार झाल्यामुळे शोचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर दोघांचं घटस्फोट होईल अशी माहिती देखील मिळत आहे. या कायदेशीर अडथळ्यांमुळे सानिया आणि शोएबचा घटस्फोट रखडला आहे. त्याचबरोबर सानिया आणि शोएब या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगलं आहे.

हेही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

दोन दिवसांपूर्वी सानियाच्या पोस्टने पुन्हा क्रिडा जगतात खळबळ माजली होती. अलीकडेच सानिया मिर्झाने एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. सानियाची ही कहाणी खूपच भावूक होती. 'तू माणूस आहेस. प्रकाश आणि अंधाराने बनलेला आहे. स्वतःला थोडे लवचिक किंवा नाजूक ठेवा आणि स्वतःवर खूप प्रेम करा. जेव्हा तुमचे हृदय सर्वात जड वाटत असेल त्या दिवसात स्वतःला विश्रांती द्यायला शिका.' असे सानियाने पोस्टमध्ये म्हटले होते.

सानिया आणि शोएबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समोर आलेला व्हिडीओ सानिया आणि शोएब यांच्या शोच्या शुटिंग दरम्यानचा आहे. दोघे देखील 'मिर्झा मलिक' शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी शोचा पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पिंजरा फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या कालवश; राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

IND vs WI, 1st Test: टीम इंडियाकडून अडीच दिवसात वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम! मायदेशात विजयपथावर परतला आपला संघ

Latest Marathi News Live Update : अनिल परबांनी अज्ञानाच प्रदर्शन केलंय- रामदास कदम

Shakti Cyclone : 'शक्ती' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका? IMDचे अपडेट आले समोर

Gautami Patil Accident : अपघात गौतमी पाटीलच्या वाहनाचा, अन् भांडण रोहित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात; दादांनी थेट आरे तुरेच्या भाषेत सुनावलं...

SCROLL FOR NEXT