Sanjana Genshan esakal
क्रीडा

Sanjana Genshan: 'मी सुंदर नाही म्हणतो, तुझा चेहरा चपलेसारखा' बुमराहच्या बायकोचा 'यॉर्कर'

सध्या संजना चर्चेत आली आहे ते तिच्या भडक वक्तव्यामुळे. तिला एका नेटकऱ्यानं ट्रोल केले.

सकाळ डिजिटल टीम

Sanjana Genshan News: भारतीय क्रिकेटविश्वातील प्रसिद्ध गोलंदाज जसप्रीत बुमराह हा त्याच्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. दुखापतीमुळे त्याला यंदाच्या टी २० वर्ल्डकपला मुकावं लागलं आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये काही प्रमाणात निराशाही पाहायला मिळाली. अनेकांनी त्याला काळजी घेत लवकर बरे होण्यास सांगितले आहे. यासगळ्यात बुमराहच्या पत्नीची एक पोस्ट सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे.

बुमराह आणि त्याची पत्नी प्रसिद्ध कॉमेंटेटर संजना गणेशन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. संजनाच्या फोटोंना आणि तिच्या पोस्टला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. तिनं शेयर केलेल्या फोटोंना चाहते मोठ्या प्रमाणावर कमेंट करताना दिसतात. सध्या संजना चर्चेत आली आहे ते तिच्या भडक वक्तव्यामुळे. तिला एका नेटकऱ्यानं ट्रोल केले. नुसतेच ट्रोल नव्हे तर तिला बुमराहवरुन सुनावलेही. यामुळे संतापलेल्या संजनानं जी प्रतिक्रिया दिली ती त्यामुळे ती चर्चेत आली आहे. चाहत्यांनी देखील तिची पाठराखण केली आहे.

हेही वाचा -बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

असं काय झालं की संजना भडकली.... सध्या संजना ही ऑस्ट्रेलियामध्ये आहे. सोशल मीडियावर तिला नेटकऱ्यानं तू तर दिसायला एवढी खास नाही मग बुमराहला कसे काय पटवले. अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे संजनानं त्याला जशास तसे उत्तर दिले आहे. बुमराह हा सध्या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेला नाही. त्यामुळे भारताला त्याची उणीव ही जाणवताना दिसते आहे. यासगळ्यात संजनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये तिच्या लूकवरुन एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया दिली होती.

Sanjana Genshan News

संजनानं त्या नेटकऱ्याला जशास तसे सुनावले आहे. मी भलेही चांगली दिसत नसेल..पण तुझा चेहरा का असा चपलेसारखा दिसतोय...अशा शब्दांत संजनानं त्याला सुनावले आहे. त्यामुळे कित्येक नेटकऱ्यांनी तिचं कौतूक केलं आहे. स्वताचा चेहरा चपलेसारखा असताना त्याच चेहऱ्यानं सगळीकडे कसा काय फिरतोय. अशी प्रतिक्रिया संजनानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Record : ख्रिस गेलचा १७५ धावांचा विक्रम उद्ध्वस्त, Lhuan-Dre Pretorius ने रचला इतिहास; २८चेंडूंत १३८ धावा

बालीत सुट्टी एन्जॉय करणं पडलं महागात! नुसरत भरुचा हिचा भीषण अपघात, ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत आणलं, Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Ratnagiri News : देवरूखच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस मोबाईल मेडिकल युनिट बंद; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Weather: ऑक्टोबर हीट'चा मुंबईला चटका, तापमानाचा पारा चाळिशीजवळ; पाहा IMDचा अंदाज

SCROLL FOR NEXT