Rishabh Pant Sakal
क्रीडा

पंतची दिमाखदार कामगिरी, दिग्गजाला बसली सणसणीत चपराक

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर आपल्या रोखठोक वक्तव्याने चर्चेत असतात. रोहित शर्मा पासून ते रविचंद्रन अश्विनपर्यंत अनेकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करुन त्यांनी वादही ओढावून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेनंतर आता माजरेकरांचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे. हे ट्विट भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतशी संबंधित आहे.

रिषभ पंत आपल्या कामगिरीत दिवसागणिक सुधारणा करताना दिसतोय. लाल चेंडूवरही तो आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एवढेच नाही तर विकेटमागेही त्याने कमालीची कामगिरी करुन दाखवीलये. फलंदाजीमध्ये पंतने 3 डावात 185 धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कारही मिळाला. त्याच्या या दिमाखदार कामगिरीनंतर संजय मांजरेकर यांचे एक ट्विट चर्चेत आले आहे. नेटकरी त्यांची शाळा घेताना दिसते.

संजय मांजरेकरांच्या व्हायल ट्विटमध्ये आहे तरी काय?

7 फेब्रुवारी 2021 मध्ये संजय मांजरेकरांनी एक ट्विट केले होते. यात त्यांनी रिषभ पंतच्या विकेट किपिंगबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. इंग्लंडचा संघ त्यावेळी भारतीय दौऱ्यावर होता. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पंतने सोची स्टम्पिंग मिस केली. त्यावर संजय मांजरेकरांनी पंतवर कडकडीत टिका केली होती.

पंतचा मोठा विक्रम

कसोटीमध्ये टी-20 स्टाइल फटकेबाजी करत पंतने श्रीलंकेविरुद्ध नवा विक्रम नोंदवला. कसोटीत भारताकडून सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झालाय. त्याने 28 चेंडूत अर्धशतक करत कपिल देव यांचा विक्रम मोडित काढला. कपिल पाजींनी पाकिस्तान दौऱ्यावर कराचीच्या मैदानात 30 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT