Sanju Samson WI Vs IND 2nd ODI Playing 11 ESAKAL
क्रीडा

Sanju Samson : पांड्या झाला कर्णधार! संजूसाठी रोहित - विराटनं करून दिली जागा

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson WI Vs IND 2nd ODI Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल केले. भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती दिली असून त्यांच्या जागी सर्वाधिक चर्चा होणाऱ्या संजू सॅमसन आणि अक्षर पटेलला संधी दिली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. (Hardik Pandya Captain)

बार्बाडोस येथेच होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने प्लेईंग 11 मध्ये अपेक्षेप्रमाणे बदल केले आहेत. नेटकरी संजू सॅमसनला संघात स्थान द्यावे यासाठी पहिल्या सामन्यापासूनच मागणी करत होते. ही मागणी अखेर दुसऱ्या वनडे सामन्यात पूर्ण झाली. (Sanju Samson Team India Playing 11)

यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माने संघातील आपली जागा खाली केली आहे. या दोघांनी दुसऱ्या वनडे सामन्यात विश्रांती घेतली असून या दोघांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. बार्बाडोसची खेळपट्टी ही फिरकीला पोषक असल्याचे पहिल्या वनडे सामन्यातच दिसले होते.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय फिरकीपटूंनी विंडीजचा संपूर्ण संघ 23 षटकात 114 धावात गुंडाळला. मात्र विजयासाठीचे 115 धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाचे देखील पाच फलंदाजी खर्ची पडले होते.

भारताकडून डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 4 तर रविंद्र जडेजाने 3 विकेट्स टिपल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT