sanju samson ेोकोत
क्रीडा

IND vs NZ: नेपियरमध्ये न खेळता संजू बनला हिरो, व्हिडिओ व्हायरल

संजू संधी न देण्यावर पांड्याने तोडले मौन, म्हणाला हा माझा संघ...

Kiran Mahanavar

Ind vs Nz Sanju Samson : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका संपुष्टात आली आहे, जी भारताने 1-0 ने जिंकली आहे. या मालिकेदरम्यान पहिल्या सामन्यापासूनच एक खेळाडू चर्चेत आहे आणि तो म्हणजे संजू सॅमसन.

न्यूझीलंडविरुद्ध या मालिकेदरम्यान संजू सॅमसनला एकदा पण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल नाही. सॅमसन प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला तरी त्याची फॅन फॉलोइंग पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. राजस्थान रॉयल्सने 22 नोव्हेंबर रोजी नेपियरमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये चाहते संजू... संजू... असे ओरड आहेत.

व्हिडिओ मध्ये दिसत आहे की, सॅमसन त्या चाहत्यांपर्यंत जातो, त्यांच्यासोबत छायाचित्रे क्लिक करतो आणि त्यांचे अभिनंदन मनापासून स्वीकारतो. कॅप्टन हार्दिक पांड्याने मालिकेनंतर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न देण्याबाबत सांगितले की, अजूनही खूप वेळ आहे आणि प्रत्येकाला संधी मिळेल आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना दीर्घ संधी मिळेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा सामना बरोबरीत सुटला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 160 धावा केल्या होत्या. किवी संघाला पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. त्याचवेळी भारताने 9 षटकांत 4 गडी गमावून 75 धावा केल्या त्या दरम्यान पाऊस सुरू झाला. यानंतर सामना तिथेच संपवावा लागला. डकवर्थ लुईस पद्धतीनुसार भारत आणि किवी संघाची धावसंख्या बरोबरीवर होती आणि अशा स्थितीत सामना टाय घोषित करावा लागला. या मालिकेतील दुसरा सामना भारताने 65 धावांनी जिंकून मालिका 1-0 अशी जिंकली. पहिला सामनाही पावसात वाहून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT