sanju samson
sanju samson  sakal
क्रीडा

Ind vs Ire: दमदार अर्धशतक संजू सॅमसनसाठी वर्ल्डकपचे दार उघडेल?

Kiran Mahanavar

टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी टी-२० विश्वचषकासाठी आपली दावेदारी मजबूत मांडली आहे. संजूची आयर्लंड दौऱ्यासाठी पहिल्यांदा संघात निवड झाली. दुसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाड अनफिट असल्याने संजूला संधी देण्यात आली. आयर्लंड दौऱ्यावर संजूने या संधीचा फायदा घेत ताबड़तोड़ अर्धशतक ठोकले.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या म्हणजे शेवटच्या सामन्यात संजूला ओपनिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. संजू सॅमसनने धडाकेबाज स्टाईलमध्ये सुरुवात करत 42 चेंडूत 77 धावांची खेळी केली. संजूने या खेळीदरम्यान चार षटकार आणि नऊ चौकार लगावले. या डावात संजूचा स्ट्राईक रेट 183.33 होता. संजू सॅमसनने आपल्या खेळीच्या जोरावर यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी दावेदारी मजबूत मांडली आहे. वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदावर हा विश्वचषक खेळला जाईल. 16 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2022 चा हंगामात संजू सॅमसनसाठी चांगला राहिला होता. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असताना संजूने आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले होते. जिथे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पराभूत केले होते. संजूने आयपीएल 2022 च्या हंगामात 17 सामने खेळले आणि 28.63 च्या सरासरीने 458 धावा केल्या.

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दीपक हुडाने 57 चेंडूत 104 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 6 षटकार आणि 9 चौकार लगावले. संजू सॅमसनने 77 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने 7 बाद 225 धावा केल्या. 226 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना आयर्लंड संघाने झुंज दिली. यजमानांनी सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि अखेरीस 5 गडी गमावून 221 धावा केल्या. आयर्लंडकडून कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने 37 चेंडूत 60 धावांची खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT