Sanju Samson India ODI Squad esakal
क्रीडा

Sanju Samson India ODI Squad : वनडे संघात संजूचे पुनरागमन मात्र Playing 11 मध्ये मिळणार का स्थान?

अनिरुद्ध संकपाळ

Sanju Samson India ODI Squad : भारताचा वेस्ट इंडीज दौरा येत्या 12 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी सामने आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच 5 टी 20 सामन्यांची मालिका देखील खेळली जाणार आहे. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाची घोषणा केली.

कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे. मात्र दोन्ही संघात काही बदल करण्यात आले आहे. कसोटी संघात युवा खेळाडूंचा समावेश करून संघाचा कायापालट करणार असल्याचे संकेत निवडसमितीने दिले आहेत. याचबरोबर वनडे संघात देखील युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनने वनडे संघात पुनरागमन केले आहे. निवडसमितीने जरी संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले असले तरी त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार का हा मोठा प्रश्न आहे.

भारतीय संघात संजू सॅमसन आणि इशान किशन असे दोन विकेटकिपर आहेत. भारताच्या संघात उजव्या हाताच्या फलंदाजांचा सुळसुळात असल्याने त्यात वैविध्य आणण्यासाठी इशान किशनला प्राथमिकता दिली जाऊ शकते.

अशा परिस्थितीत संजू सॅमसनला मधल्या फळीत फलंदाज म्हणून खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र संघाचे कॉम्बिनेशन पाहिले तर त्याची देखील शक्यता थोडी कमीच वाटते. कारण रोहित शर्मा, शुभमन गिल सलामीला येतील त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या अशी मधली फळी असेल.

वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारताचा वनडे संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT