Sara Tendulkar Party Photographs With Mistry Boy  esakal
क्रीडा

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचे पार्टीतील फोटो व्हायरल; कोण आहे तो 'मिस्ट्री बॉय'

अनिरुद्ध संकपाळ

Sara Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या पोस्ट आणि फोटो कायम व्हायरल होत असतात. दरम्यान, सारा तेंडुलकरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या फोटोत सारा तेंडुलकर ही पार्टी करताना दिसत आहे. मात्र या फोटोत सारासोबत दिसणारा हा मिस्ट्री बॉय कोण आहे याबाबत चाहत्यांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे.

सारा तेंडुलकरचे वास्तव्य सध्या लंडनमध्ये आहे. ती शिक्षणासाठी लंडनमध्ये गेली आहे. मात्र ती शिक्षणाबरोबरच मॉडेलिंग क्षेत्रातही आपला हात आजमावत आहे. साराने काही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी जाहिरात देखील शूट केली होती. सेलिब्रेटी असलेल्या साराचे नाव भारतीय संघातील उगवता तारा शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात होते. मात्र आता शुभमन सारा तेंडुलकरला नाही तर सारा अली खानला डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, सारा तेंडुलकरचे व्हायरल होत असलेले पार्टीतील फोटो पाहून सारासोबत फोटोत दिसणारा तो मिस्ट्री बॉय कोण आहे याची देखील 'सोशल' चर्चा सुरू आहे. सारा तेंडुलकरबरोबर फोटोत दिसणारा तो मिस्ट्री बॉय हा ओरी नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे पूर्ण नाव ओरहान अवात्रामणी असे आहे. पार्टीचे हे फोटो लंडनमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. ओरीची बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींमध्ये उठबस असते. आरीचे अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, जान्हवी कपूर यांच्यासोबत पार्टी करतानाचे देखील फोटो व्हायरल झाले आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

Taurus Horoscope 2026 : घर-जमीन खरेदीसाठी अनुकूल काळ, शनीच्या कृपेने वृषभ राशीला लाभाचा मार्ग, पण..; या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष?

SCROLL FOR NEXT