Sarfaraz Khan vs BCCI sakal
क्रीडा

IND vs WI : टीम इंडियात निवड न झाल्याने सरफराज खानने BCCI निवडकर्त्यांना दिले उत्तर, फोटो होतोय व्हायरल

रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सरफराजला संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले पण आता....

Kiran Mahanavar

Sarfaraz Khan Instagram Story: कसोटी सामन्यांव्यतिरिक्त भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर सुनील गावस्कर, वसीम जाफर यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय सर्फराज खानला या भारतीय संघात स्थान मिळायला हवे होते, असे सोशल मीडियावरील चाहत्यांचे मत आहे. मात्र, आता सरफराज खाननेच बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

सरफराज खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सरफराज खानच्या रणजी ट्रॉफी हंगामातील हायलाइट्स आहेत. या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नसले तरी, सोशल मीडिया चाहत्यांचे म्हणणे आहे की या युवा फलंदाजाने बीसीसीआयच्या निवडकर्त्यासाठी एक संदेश आहे.

सरफराज खानने रणजी ट्रॉफी 2023 हंगामातील 9 डावात 556 धावा केल्या. सरफराज खानची या मोसमात सरासरी 92.66 होती. तर या युवा फलंदाजाने 72.49 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. याशिवाय सर्फराज खानने 3 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला.

Sarfaraz Khan

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल. , कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, आर. मो. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT