Duleep Trophy 2023 
क्रीडा

Duleep Trophy : विंडीज दौऱ्यासाठी डावललेल्या सर्फराजने खातंही उघलं नाही, सूर्याही फेल

सर्फराज अन् सूर्या चर्चेतील नावांची हाराकिरी; एकाला तर भोपळाही फोडता आला नाही

Kiran Mahanavar

Duleep Trophy 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला केवळ एकाच कसोटीत संधी मिळाली. उर्वरित मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली. यानंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही खेळला नाही.

आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर झाला असून, त्यातही सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान सूर्यकुमार यादव आणखी एका सामन्यात मैदानात उतरला आहे, पण तो स्वस्तात बाद झाला. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त सर्फराज खान आणि पृथ्वी शॉ देखील फ्लॉप झाले.

आजपासून दुलीप ट्रॉफी अंतर्गत पश्चिम विभाग आणि मध्य विभाग यांच्यातील सामना सुरू झाला आहे. त्यात पश्चिम विभागातील अनेक धडाकेबाज फलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव आणि सर्फराज खान यांच्या नावाचा समावेश आहे. पृथ्वी शॉ सलामीवीर म्हणून मैदानात आला आणि त्याला 54 चेंडूत केवळ 26 धावा करता आल्या.

चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेला सूर्यकुमार यादव 13 चेंडूत सात धावा करून बाद झाला. त्याचवेळी, सर्फराज खानला त्याचे खातेही उघडता आले नाही, त्याने 12 चेंडू खेळले. तिसर्‍या क्रमांकावर खेळायला आलेल्या चेतेश्वर पुजाराने नक्कीच थोडी ताकद दाखवली आणि 50 हून अधिक चेंडूंचा सामना केला, पण चेंडूनुसार त्याच्या खात्यात जास्त धावा जमा झाल्या नाहीत.

सूर्यकुमार यादवला टीम इंडियासाठी फक्त एकच सामना खेळायला मिळाला आहे, तर पुजाराला WTC मध्ये त्याच्या नावानुसार कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या संघात सरफराज खानचा समावेश होईल अशी अपेक्षा होती, मात्र त्याच्या नावाचाही विचार झाला नाही. दुसरीकडे पृथ्वी शॉचाही एक प्रकारे टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना विसर पडला आहे. आगामी सामन्यांमध्ये ते कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT