सात्विकसाईराज - अश्वीनी पोनप्पा
सात्विकसाईराज - अश्वीनी पोनप्पा 
क्रीडा

सात्विकसाईराजचे दुहेरीत दुहेरी यश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सात्विकसाईराज रांकीरेड्डीने चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या दिवशी दुहेरीतील दोन्ही लढती जिंकल्या. सात्विकने अश्विनी पोनप्पासह मिश्र दुहेरीत सलामीची लढत जिंकताना जागतिक क्रमवारीत सातव्या जोडीस हरवले; तर त्यानंतर सात्विक-चिराग शेट्टीने पुरुष दुहेरीची लढत दोन गेममध्येच जिंकली.

चॅंगझाऊ येथे सुरू असलेल्या 10 लाख डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत सात्विक-अश्विनीने प्रवीण जॉर्डन-मेलाती दाएवा ऑक्ताविआंती यांना 22-20, 17-21, 21-17 असे 50 मिनिटांत पराजित केले. सात्विक-चिरागने जॅसन अँथनी होऊ शूए-न्यी याकुरा यांना 21-7, 21-18 असे अर्ध्या तासात पराजित केले.

जॉर्डन-मेलातीने आतापर्यंत एकंदर पाच स्पर्धांत अंतिम फेरी गाठली आहे, सात्विक-अश्विनीने त्यांना मोक्‍याच्यावेळी दडपणाखाली आणले. पहिल्या गेममधील 4-7 पिछाडीनंतर भारतीय जोडीचा खेळ उंचावला. मात्र, ते ब्रेकच्या 11-10 आघाडीनंतर 12-18 मागे पडले. भारतीयांचा चिवट प्रतिकार अखेर सरस ठरला. दुसऱ्या गेममध्ये पहिल्या गेमचीच काहीशी पुनरावृत्ती झाली, पण प्रतिकार सुरू होत असतानाच भारतीयांकडून चुका झाल्या. निर्णायक गेममध्ये सुरुवातीस घेतलेली 4-2 आघाडी भारतीयांनी 11-6 करीत निकालच स्पष्ट केला.

सात्विक-चिरागने सुरुवातीस 6-0 आघाडी घेतल्यापासून निकाल स्पष्ट होता. पहिल्या गेममध्ये त्याने कधीही सलग दोन गुण गमावले नाहीत. दुसऱ्या गेममध्ये भारतीय सुरुवातीपासून मागे पडले, पण 7-15 पिछाडीनंतर त्यांनी सलग नऊ गुण घेत आघाडी घेतली आणि ती कधीही गमावली नाही.

भारतीयांसमोरील आजचे आव्हान
सिंधू वि. ली झूएरुई
- जागतिक क्रमवारीत सिंधू सहावी, तर ली 19 वी
- प्रतिस्पर्ध्यातील सहा लढतीत दोघांचे तीन विजय
- यंदाच्या एकमेव लढतीत सिंधूची पहिला गेम गमावल्यावर सरशी, त्यापूर्वीची लढत चार वर्षापूर्वी

साईना वि. बुसनान ऑगबॅमारुंगफान
- जागतिक क्रमवारीत साईना आठवी, तर बुसनान 18 वी
- प्रतिस्पर्ध्यातील चारपैकी तीन लढतीत साईनाचा विजय
- दोघींतील यापूर्वीची लढत 2017 मध्ये, त्यात साईना पराजित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT