Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty X/BAI_Media
क्रीडा

Satwik-Chirag Badminton: सात्विक-चिरागने रचला इतिहास! 'ही' कामगिरी करणारे पहिलेच भारतीय, सायना नेहवालचा विक्रमही मोडला

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty: भारताची स्टार बॅडमिंटनपटूंची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची यशस्वी घौडदौड सुरू असून आता त्यांनी आणखी एक मोठा विक्रम केला आहे.

Pranali Kodre

Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty: भारताची स्टार बॅडमिंटनपटूंची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची यशस्वी घौडदौड सुरू असून आता त्यांनी आणखी एक मोठा विक्रम केला आहे. त्यांनी सायना नेहवालचा विक्रम मोडला आहे.

सात्विकसाईराज आणि चिराग यांची जोडी पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी अव्वल क्रमांकावर गेले 10 आठवडे आपले स्थान कायम राखले आहे.

त्यामुळे सात्विक आणि चिराग पहिलेच भारतीय बॅडमिंटनपटू ठरले आहेत, ज्यांनी 10 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. यापूर्वी सायना नेहवालने 18 ऑगस्ट ते 21 ऑक्टोबर 2015 दरम्यान सलग 9 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक टिकवला होता.

विशेष म्हणजे सात्विक आणि चिराग ही पहिली भारतीय पुरुष बॅडमिंटन जोडी आहे, ज्यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सध्या सात्विक आणि चिराग यांचे 1,02,303 पाँइंट्स आहेत. त्यांच्यात आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या कँग मिन ह्युक आणि सेओ सेउंग जे या जोडीमध्ये 5000 पाँइंट्सचा फरक आहे.

सात्विकसाईराज आणि चिराग यांनी गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा जिंकून भारताचा तिरंगा मानाने फडकावला आहे. त्यांनी इंडिया ओपन 2022 स्पर्धा जिंकल्यानंतर कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्यांनी भारताला ऐतिहासिक थॉमस कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

तसेच त्यांनी राष्ट्रकूल स्पर्धेत, आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय देखील त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. त्यांनी नुकतेच फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेचेही विजेतेपद जिंकले.

तसेच यंदाच्या वर्षात त्यांनी आत्तापर्यंत तीनवेळा अंतिम फेरीतही स्थान मिळवले. त्यांना भारत सरकारकडून यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारही जाहीर झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT