Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty esakal
क्रीडा

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

अनिरुद्ध संकपाळ

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : भारताच्या सात्विकराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरूष दुहेरी जोडीनं थायलंड ऑपनची फायनल गाठली आहे. त्यांनी तैवानच्या ली मिंग चे आणि तांग काई वेई या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव केला. एशियन गेम्सध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या या भारतीय जोडीने तैवानच्या जोडीचा 35 मिनिटात पराभव केला. त्यानी सामना 21-11, 21-12 अशा दोन गेममध्ये जिकंला.

सात्विक आणि चिरागचे थायलंडशी एक घट्ट नातं आहे. त्यांनी पाच वर्षापूर्वी 2019 ला इथेच पहिल्यांदा सुपर 500 स्पर्धा जिंकली होती. आता ते अजून एक विजेतेपद पटकावण्याच्या जवळ पोहचले आहेत.

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड टूरमध्ये सात्विक अन् चिरागने एक वादळ निर्माण केलं आहे. त्यांनी हंगामात चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी मलेशिया ओपन 1000 आणि इंडिया सुपर 500 मध्ये मध्ये उपविजेतेपद पटकावलं. त्यानंतर मार्चमध्ये त्यांनी फ्रेंच सुपर 750 चे विजेतेपद पटकावलं.

आता रविवारी सात्विक आणि चिराग आपला हंगामातील चौथा अंतिम सामना खेळणार आहेत. ही भारतीय जोडी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. आता त्यांचा सामना चीनच्या चॅन बो यँग आणि लुई यी सोबत होणार आहे. त्यांनी दक्षिण कोरियाच्या जोडीचा 21-19, 21-18 अशा गोममध्ये पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT