satwiksairaj rankireddy chirag shetty 
क्रीडा

Badminton : चिराग-सात्विकनं रचला इतिहास! प्रथमच जिंकले कोरिया ओपनचे विजेतेपद

सकाळ ऑनलाईन टीम

Korea Open Mens Doubles : आशियाई चॅम्पियन सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रविवारी आणखी एक आश्चर्यकारक कामगिरी केली. या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो या जोडीचा 17-21, 21-13, 21-14 असा चुरशीच्या लढतीत पराभव करून कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

दोघांच्या कारकिर्दीतील हे तिसरे सुपर 500 विजेतेपद आहे. यापूर्वी या दोघांनी 2019 मध्ये थायलंड ओपन, 2022 मध्ये इंडिया ओपन जिंकली आहे. या जोडीने प्रथमच कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

भारतीय जोडीने पहिला गेम गमावला. मात्र या जोडीने हार मानली नाही आणि पुढच्या दोन गेममध्ये दमदार खेळ दाखवत सामना जिंकून जेतेपदावर नाव कोरले. उपांत्य फेरीत या जोडीने जगातील दुसऱ्या क्रमांकाची जोडी असलेल्या चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या जोडीचा पराभव केला. अंतिम फेरीत पण भारतीय जोडीने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर दोघांनीही जल्लोष केला आणि प्रत्येक वेळी प्रमाणेच जोरदार डान्स केला. दोघांनी गंगनम स्टाइलमध्ये डान्स केला.

या दोघांच्या जोडीने भारताला अनेक यश मिळवून दिले आहेत. गतवर्षी सात्विक आणि चिरागने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय थॉमस कपमध्येही या जोडीला सुवर्ण जिंकण्यात यश आले होते.

या जोडीने जागतिक चॅम्पियनशिपमध्येही चमत्कार केले आणि कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले. याशिवाय सय्यद मोदी, स्विस ओपन, थायलंड ओपन, इंडिया ओपन, सुपर 750 फ्रेंच ओपन ही जेतेपदे त्यांच्या नावावर होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT