Hockey Tournament sakal
क्रीडा

Schoolympics 2023 : सेंट हेलेना संघाविरुद्ध हॉकी स्पर्धेत सेंट जोसेफचे अकरा गोल

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या हॉकी स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट जोसेफ, पाषाण संघाने सेंट हेलेना, कॅम्प संघावर ११-० असा दमदार विजय मिळविला. नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर स्पर्धेची साखळी फेरी सुरू आहे. त्यामध्ये सेंट जोसेफच्या तराशा सुखिजा हिने तब्बल सात गोल नोंदविले. तिला अन्वी रावत हिने चार गोलांसह सुरेख साथ दिली. प्रतिस्पर्धी संघाला एकदाही जाळीचा वेध घेता आला नाही.

याच वयोगटात सेंट ॲन्स हायस्कूल, कॅम्प संघाने एसएनबीपी इंटरनॅशनल, चिखली संघाचा ४-० असा पराभव केला. सेंट जोसेफ, खडकी आणि न्यू मिलेनियम, नवी सांगवी यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.

मुलांच्या गटात न्यू मिलेनियम, नवी सांगवी संघाने ज्योती हायस्कूल, पिंपरीवर ३-२ अशी मात केली. प्रसाद जगदाळे, श्रेयश भरत, वेदांत गंगाराई यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. न्यू मिलेनियमच्या संघातून अंकित भंडारी आणि प्रिंस पटिया यांनी गोल केले. २-२ बरोबरीनंतर वेदांतने केलेला गोल निर्णायक ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT