Glenn Maxwell in haldi ceremony Sakal
क्रीडा

मॅक्सवेल-विनीच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट; फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Glenn Maxwell in haldi ceremony: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएलच्या 2022 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी तो भारतीय वंशाच्या विनी रमनसोबत (Glenn Maxwell-Vini Raman) लग्न बंधनात अडकला. दोघांनी बराच काळ एकत्र वेळ घालवल्यानंतर नव्या इनिंगला सुरुवात केली. आता ही जोडी याच महिन्यातील 27 मार्चला तमिळ परंपरेनुसार विवाह थाटणार आहेत. याची तयारीही सुरु झाली आहे.

विनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हळदी समारंभाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघही एका हटके लूकमध्ये दिसत आहेत. विनने नारंगी रंगाती साडी नेसली असून मॅक्सवेल कुर्ता घालून फोटोसाठी खास पोझ देताना दिसते. लग्नाची तयारी सुरु झाली आहे, याची एक खास झलक या कॅप्शनसह विनीने फोटो शेअर केला आहे. फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.

मॅक्सवेलला हळत लावताना विनी रमन हिने गडद हिरव्या रंगाची साडी नेसली होती. बनारसी सिल्क साडीतील तिचा लूक बघण्याजोगा असाच आहे. विनीने इन्स्टाग्रामवरुन आणखी एक फोटो शेअर केलाय. या फोटोला तिने 'हॅप्पी लाइफ, हॅप्पी वाइफ, असे खास कॅप्शन दिले आहे.

मॅक्सवेल आणि विनी रमन यांच्या तमिळ भाषेतील लग्न पत्रिकेचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. लग्नामुळे मॅक्सवेल पाकिस्तान दौऱ्याला मुकला होता. आता तो आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतीलाही मुकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT