krida sakal
क्रीडा

Republic Day 2024 : पद्मश्री या मानाच्या पुरस्कारासाठी उदय देशपांडे यांची निवड ; मल्लखांब ऑलिंपिकमध्ये न्यायचाय : देशपांडे

मागील ५० वर्षे मल्लखांब या महाराष्ट्रातील मातीतल्या खेळासाठी जीवन वेचणारे उदय देशपांडे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मागील ५० वर्षे मल्लखांब या महाराष्ट्रातील मातीतल्या खेळासाठी जीवन वेचणारे उदय देशपांडे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी दैनिक ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. मल्लखांब खेळाला आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल व ऑलिंपिक या महत्त्वाच्या स्पर्धांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय त्यांनी या वेळी व्यक्त केले.

मल्लखांब या खेळाला ग्लॅमर नाही. दंडबैठका व व्यायाम यापलीकडे त्याकडे बघितले जात नाही. त्यामुळे या खेळाला मान्यता मिळणे कठीण होते. यासाठी प्रचंड

मेहनत करावी लागली; पण गेल्या काही वर्षांमध्ये या खेळाने उत्तुंग झेप घेतली आहे.

सुरुवातीला रेल्वेतील शौचालयाच्या शेजारी बसून खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी जात होते. आता विमानातून प्रवास करायला मिळतो. यासाठी केंद्र सरकारचेही आभार मानतो. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडूनही सहकार्य लाभले, असे ते आवर्जून सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Cut : पुण्यात सोमवारपासून पाणी कपात; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Pune News : शहरात १५ जूनपासून जड वाहनांना प्रवेश बंदी

FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यात आणखी एक कारवाई; साडेचार लाख रुपयांचा माल जप्त

Pune Accident : येरवडा, लोणी काळभोरमधील अपघातांत दोन ज्येष्ठांचा मृत्यू

Pune Water Cut schedule : पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT