Novak Djokovic | Paris Olympic Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: जोकोविचनं पूर्ण केलं 'गोल्डन स्लॅम'! फायनलमध्ये अल्काराजला नमवत पटकावलं सुवर्णपदक

Novak Djokovic vs Carlos Alcaraz Gold Medal Match: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ३७ वर्षीय नोवाक जोकोविचने कार्लोस अल्काराजला टेनिसच्या एकेरी गटात अंतिम सामन्यात पराभूत करत सुवर्णपदक पटकावले.

Pranali Kodre

Novak Djokovic won Gold Medal at Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत टेनिसमध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराज यांच्यात झाला. अव्वल दोन मानांकित खेळाडूंमध्ये झालेल्या या सामन्यात ३७ वर्षीय नोवाक जोकोविचने ७-६, ७-६ असा विजय मिळवला.

या विजयासह त्याने सार्बियाच्या खात्यात सुवर्णपदकाची भर टाकली. त्याचं हे ऑलिम्पिकमधील पहिलंच सुवर्णपदक आहे. त्याच्या विजयामुळे स्पेनच्या अल्काराजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

तब्बल २ तास ५० मिनिटे चाललेल्या या सामन्यात युवा अल्काराजने शेवटपर्यंत मोठी झुंज दिली. पहिला सेट तब्बल ९४ मिनिटांचा झाला. दोघांनीही आपापल्या सर्व्हिसवर विजय मिळवला. त्यामुळे या सेटमध्ये ६-६ अशा बरोबरीनंतर टायब्रेकमध्ये या गेमचा निकाल लागला. यामध्ये जोकोविचने ७-३ असा विजय साकारला व १-० अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्येही दोन्ही टेनिसपटूंमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. दोघांमध्ये ६-६ अशी बरोबरी झाल्यानंतर पुन्हा टाय ब्रेक झाला. यामध्ये जोकोविचने ७-२ अशी सहज मात केली आणि सुवर्णपदकावर हक्क सांगितला.

यापूर्वी जोकोविचने १६ वर्षांपूर्वी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले होते. त्याने २००८ मध्ये बिजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरीत कांस्य पदकाला गवसणी घातली होती.

त्यानंतर २०१२ लंडन ऑलिम्पिक आणि २०२१ टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. २०२१ मध्ये त्याला मिश्र विभागातही निना स्टोजानोविच हिच्यासह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

जोकोविचने या सुवर्णपदकासह त्याच्या कारकिर्दीतील गोल्डन स्लॅमही पूर्ण केले. गोल्डन स्लॅम म्हणजे चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याबरोबरच ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे.

एकेरीमध्ये गोल्डन स्लॅम पूर्ण करणारा तो केवळ पाचवाच टेनिसपटू आहे. यापूर्वी स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, राफेल नदाल आणि सेरेना विलियम्स यांनाच असा पराक्रम करता आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT