Serena Williams Give Indication Of Returning on Tennis Court  esakal
क्रीडा

Serena Williams : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! टेनिस कोर्टवरील 'महाराणी' परतणार?

अनिरुद्ध संकपाळ

Serena Williams Returning On Tennis Court : जगविख्यात महिला टेनिसपटू सेरेना विलियम्सने काही महिन्यापूर्वीच झालेल्या युएस ओपन टेनिस स्पर्धेनंतर टेनिस कोर्टपासून दूर जात असल्याचे सांगितले होते. मात्र सेरेना विलियम्सने सोमवारी ती अजून निवृत्त झाली नसल्याचे सांगितले. सेरेनाने मी पुन्हा कोर्टवर परतण्याची दाट शक्यता आहे. सेरेनाच्या नावावर 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. या पृथ्वीतलावरील 23 ग्रँडस्लॅम जिंकणारी (ओपन एरा) ती एकमेव टेनिस स्टार आहे. सेरेना विलियम्सने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तिच्या गंतवणूक कंपनीची जाहीरात करताना मी निवृत्त झालेली नाही असे सांगितले.

वयाची 40 शी पार करत आलेल्या विलियम्सने 9 ऑगस्टला व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती. यावेळी तिने खेळाव्यतिरिक्त ती इतर बाबतही समृद्ध होण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. सेरेना विलियम्स आपले कुटुंब वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

सेरेना विलियम्सने व्होग्स नियतकालिकेतील आपल्या लेखात म्हणाली होती की, 'मला निवृत्ती हा शब्द आवडत नाही. मला असे वाटते की हा संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळे मी तो शब्द वापरण्याबाबत खूप संवेदनशील आहे. याचा काहीतरी विशिष्ट अर्थ आहे आणि ही गोष्ट लोकांच्या समुहासाठी खूप महत्वाची आहे.'

सेरेना विलियम्सने आतापर्यंत 23 एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपदं जिंकली आहेत. ओपन एरामध्ये अशी कामगिरी करणारी ती एकमेव टेनिसपटू आहे. सर्वकालीन यादीत मार्गारेट कोर्ट्स (24) पेक्षा फक्त एक ग्रँडस्लॅम मागे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT