क्रीडा

The Hundred Womens : नाद खुळा बाऊन्स बॅक! विजयासाठी 5 चेंडू 8 धावा... शबनमचा हॅट्ट्रिक कारनामा!

अनिरुद्ध संकपाळ

The Hundred Womens Shabnim Ismail Hat Trick : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड महिला स्पर्धेत गुरूवारी बर्मिंघम फिनिक्स आणि वेल्श फायर यांच्या एक जबरदस्त सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची माजी वेगवान गोलंदाज शबनम इस्माईलने भन्नाट स्पेल टाकला. तिने शेवटच्या षटकात संपूर्ण सामनाच फिरवला. शेवटच्या 5 चेंडूत विजयासाठी 8 धावांची गरज असताना इस्माईल हॅट्ट्रिक साधत वेल्श फायरला सामना जिंकून दिला.

वेल्श फायनरने बर्मिंघम फिनिक्सविरूद्ध 100 चेंडूत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 137 धावा केल्या होत्या. बर्मिंघम फिनिक्सला या आव्हानाचा पाठलाग करताना 4 विकेट्स गमावून 134 धावांपर्यंतच मजल मारता आली. ते विजयापासून 4 धावांनी दूर राहिले. वेल्श फायरने 3 धावांनी सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. बर्मिंघमला विजयापासून दूर ठेवण्यात शबमन इस्माईलचा मोठा वाटा होता.

पराभवाच्या दाढेतून विजया आणला खेचून

या सामन्याची सामनावीर राहिलेल्या शबनमने 20 चेंडूत 31 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या तीनही विकेट्स तिने शेवटच्या 5 चेंडूत घेतल्या होत्या. शबनम ज्यावेळी शेवटचे पाच चेंडू टाकत होती त्यावेळी बर्मिंघमला विजयासाठी 8 धावांची गरज होती. मात्र पहिल्या दोन चेंडूवरच तिने पाच धावा दिल्या. यात तिला एक चौकार देखील बसला.

बर्मिंघहमला विजयासाठी 3 चेंडूत 4 धावांची गरज होती. सामना त्यांच्या मुठीत होता. मात्र यानंतर पुढच्या तीन चेंडूवर तिने सलग तीन विकेट घेत हॅट्ट्रिक साधला. याचबरोबर वेल्शने गमावलेला सामना जिंकला.

हॅट्ट्रिक करणारी तिसरी खेळाडू

शबमन इस्माईल ही द हंड्रेड वुमन्स स्पर्धेच्या इतिहासात हॅट्ट्रिक करणारी तिसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी एलना किंगने गेल्या वर्षी हॅट्ट्रिक घेतली होती. या स्पर्धेत सर्वात पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज इम्रान ताहिरने हॅट्ट्रिक घेतली होती. त्याने 2021 मध्ये बर्मिंघम फिनिक्सकडून खेळताना हा कारनामा केला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT