Shafali Verma WPL 2023 ESAKAL
क्रीडा

Shafali Verma : 6, 6, 6, 6, 6... शेफाली एकदा सुटली की सुटली! 19 चेंडूत ठोकल्या 50 धावा अन् 7 षटकात गुजरातचा चुराडा

अनिरुद्ध संकपाळ

Shafali Verma WPL 2023 : डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज (दि. 11) शफाली वर्मा नावाचं वादळ आलं होतं. या वादळी तडाख्यात गुजरात जायंट्सचा पार पालापाचोळा होऊन तो हवेत उडून गेला. जसं हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यावर अदानी ग्रुपच्या शेअर्सचा दररोज चुराडा होत होता. तसंच आज अदानींच्या गुजरात जायंट्सचं झालं. मात्र हा चुराडा शफाली वर्माने केला, तोही अवघ्या 7 षटकात!

शफाली वर्माने 19 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. ही खेळी WPL 2023 च्या हंगामातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. शफाली इथर्यंतच थांबली नाही तर तिने दिल्लीला 10 विकेट्स अन् 77 चेंडू राखून पराभव केला. दिल्लीने गुजरातचे 106 धावांचे आव्हान अवघ्या 7.1 षटकात पार केले.

शफाली वर्माने एकटीने 28 चेंडूत 76 धावा चोपल्या. त्यात 10 चौकार आणि 5 षटकारांची आतशबाजी होती. शफाली वर्माने 271.43 च्या स्ट्राईक रेटने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. सलामीवीर शफाली वर्माला कर्णधार आणि सलामीवीर मेग लेनिंगने 15 चेंडूत नाबाद 21 धावा करत चांगली साथ दिली.

तत्पूर्वी, आजच्या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या मारिझाने कापच्या भेदक माऱ्यासमोर गुजरातला 20 षटकात 9 बाद 105 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून किम ग्राथने 32 धावांची झुंजार खेळी केली. मारिझानेने 4 षटकात 15 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तिला शिखा पांडेने 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

SCROLL FOR NEXT