Shaheen Afridi Wedding  esakal
क्रीडा

Shaheen Afridi Wedding : हे खूप निराशाजनक! इतकी विनंती करून देखील... शाहीन आफ्रिदी लग्नानंतर जाम भडकला

अनिरुद्ध संकपाळ

Shaheen Afridi Wedding : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची 3 फेब्रुवारी रोजी विकेट पडली. ही विकेट दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शाहिद आफ्रिदीच्या मुलीनेच पाडली. गेल्या काही वर्षापासून शाहीन आणि शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा यांच्या लग्नाची नुसती चर्चाच होत होती.

अखेर हा शाही निकाह पार पडला. यावेळी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम, सर्फराज अहमद, नसीम शाह आणि शादाब खान देखील उपस्थित होते. मात्र लग्नानंतर शाहिद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदीने सोशल मीडियावर एक ट्विट करत निराशा व्यक्त केली.

शाहीन आफ्रिदीला राग का आला?

शाहीन आफ्रिदीने निकाह पार पडल्यानंतर सोशल मीडियावर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने पहिल्यांदा हा खास दिवस अजूनच स्मरणीय केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्यानंतर त्याला त्याला जोडूनच शाहीन आफ्रिदीने निराशा व्यक्त करणारे एक ट्विट केले.

तो ट्विटमध्ये म्हणाला की, 'हे खूप निराशाजनक आहे सातत्याने आणि खूप विनंती करून देखील आमची प्रायव्हसी भंग झाली. बेशरम लोकं पत्नीचा फोटो अजून देखील शेअर करत आहेत. मी नम्रपणे विनंती करतोय की लोकांनी आमच्याशी समन्यव साधावा आणि आमचा स्मरणीय दिवस खराब करू नये.'

फोन बंद ठेवण्याची होती सुचना

आफ्रिदी परिवाराने लग्नात आलेल्या आपल्या पाहुण्यांना त्यांचा फोन बंद ठेवण्याची विनंती केली होती. समारंभ स्थळाच्या प्रवेशद्वारावर देखील तशा सुचना लिहिल्या होत्या. तुम्ही आज आम्हाला खूप मोठं गिफ्ट देऊ शकता, तुम्ही कृपया तुमचा मोबईल फोन बंद ठेवा आणि आमच्या खास क्षणांचा आनंद घ्या. मात्र या सुचनेनंतरही शाहीनच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

गेल्या महिन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानने देखील पाकिस्तानचे प्रमुख प्रशिक्षक सकलेन मुश्ताकच्या मुलीसोबत लग्न केल्याची घोषणा केली होती. त्यांनीही फोटो सोशल मीडियावर व्हायरल न करण्याची विनंती केली होती. त्यांचा कोणताही फोटो लीक झाला नव्हता.

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT