क्रीडा

IND vs PAK: पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताविरुद्ध रचला इतिहास, असा पराक्रम आशिया कपमध्ये पहिल्यांदाच...

Kiran Mahanavar

Ind vs Pak Asia Cup 2023 : आशिया कप 2023 चा तिसरा आणि हाय व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात पल्लेकेले येथे खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 48.5 षटकांत सर्वबाद 266 धावा केल्या. भारताकडून इशान किशनने 82 आणि हार्दिक पांड्याने 87 धावा केल्या.

पाकिस्तानी गोलंदाजांनी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक भारतीय संघाचे सर्व 10 फलंदाज पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी बाद केले. आशिया कपमध्ये इतिहासात असे प्रथमच घडले आहे.

पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर हरिस रौफ आणि मोहम्मद नसीमने ३-३ बळी घेतले. अशा प्रकारे भारतीय संघाचे सर्व 10 फलंदाज पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचे बळी ठरले.

शाहीन आफ्रिदीने 10 षटकांत 35 धावांत 3 खेळाडू बाद केले. कर्णधार रोहित शर्माशिवाय शाहीन आफ्रिदीने विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना बाद केले.

नसीम शाहने शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

तर हरिस रौफने शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि इशान किशनला आपला बळी बनवले. त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानसमोर विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT