Shahid Afridi PM Shehbaz Sharif Pakistan
Shahid Afridi PM Shehbaz Sharif Pakistan  esakal
क्रीडा

शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले, शाहिद आफ्रिदी 'ट्रोल' झाला

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानातील राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आणि शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शरीफ यांना शुभेच्छा देण्याऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) देखील होता.

शाहिद आफ्रिदीने ट्विट केले की, 'शाहबाज शरीफ यांचे पाकिस्तानचे वजीर - ए - आजम झाल्याबद्दल अभिनंदन. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या व्यवस्थापन कौशल्याने पाकिस्ताला सध्याच्या आर्थिक आणि राजनैतिक संकटातून बाहेर काढाल.' शाहिद आफ्रिदीचे हे ट्विट पाकिस्तानातील अनेक नेटकऱ्यांना आवडले नाही. त्यांनी शाहिद आफ्रिदीवर सडकून टीका केली.

ट्विटरवर झाकर यांनी लिहिले की, 'मला कोणतीही निराशा नाही. मी आश्चर्यचकीत देखील झालेलो नाही. मला आशा होतीच की तुम्ही टुकार वक्तव्य कराल.' दुसरीकडे जावेद तारिक लिहितात की, 'आफ्रिदी कायम दोन्ही बाजूंनी खेळतो. अनेक मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली आहे.' मीर वसीम लिहितात, लाला तू लाखो लोकांचे ह्रदय तोडू शकत नाहीस. ही पोस्ट डिलीट करून टाक.' शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानातील लोक प्रेमाने लाला असे संबोधतात.

शाहिद आफ्रिदीच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यावर अजून बऱ्याच कमेंट आल्या आहेत. यातील अनेक कमेंट या नकारात्मक आणि टीका करणाऱ्या आहेत. एका युजरने ट्विट केले की 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मी तुमची मोठी फॅन होते. तुम्ही कायम खऱ्याचा आणि योग्य व्यक्तीला पाठिंबा देता. मात्र दुर्दैवाने तुम्ही ....' यानंतर सईद फवाद लिहितात की, 'कायम औपचारिकता लागू होत नाही. अनेक वेळा आपल्याला योग्य आणि चुकीचा यातील एकाची निवड करावी लागते. यावेळी आफ्रिदीने चुकीच्या माणसाला निवडले.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT