Shahid Afridi Shaheen Afridi  esakal
क्रीडा

Shahid Afridi Shaheen Afridi : जरा नसीम शाहकडून शिका... सासरेबुवांनी जावयाला दिला घरचा आहेर

अनिरुद्ध संकपाळ

Shahid Afridi Shaheen Afridi : आशिया कप 2023 च्या सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे पाकिस्तानला आशिया कपची फायनल गाठण्यासाठी श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. भारताने पाकिस्तानविरूद्ध 356 धावांचा डोंगर उभारला.

भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 121 धावांची दमदार सलामी दिली होती. तर विराट कोहलीने 122 आणि केएल राहुलने 111 धावांची नाबाद शतकी खेळी करत भारताला 356 धावांपर्यंत पोहचवले.

पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला भारतीय फलंदाजांना चांगलेच चोपले होते. या धुलाईनंतर आता शाहिद आफ्रिदीने आपल्या जावयाचे कान उपटले असून त्याला नसीम शाह सारखी गोलंदीज करण्याचा सल्ला दिला.

अत्यंत खराब लेंथ नसीमकडून शिका

पाकिस्तानला भारताविरूद्धच्या सामन्यात 357 धावांचे मोठे आव्हान मिळाले होते. मात्र त्यांना 32 षटकात 8 बाद 128 धावाच करता आल्या. नसमी आणि हारिस दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने शाहीनला आपल्या लाईन आणि लेंथवर काम करण्याचा सल्ला दिला.

खेळपट्टी चांगली मात्र...

शाहिद म्हणाला की, जर तुम्ही पहिल्या दोन षटकात विकेट घेण्यात अपयशी ठरला तर तुम्ही स्वतःवर नाराज होऊ शकत नाही. शाहीनबाबत बोलताना शाहिद म्हणाला खेळपट्टी जरी चांगली असली तरी गोलंदाजी चांगली नव्हती. शाहीनने नसीम ज्या लेंथवर गोलंदाजी करतो त्या लेंथवर गोलंदाजी का केली नाही.

नाणेफेकीनंतर गोलंदाजी करण्यावरही भडकला शाहिद

शाहिद आफ्रिदीने नाणेफेकीनंतर गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर देखील नाराजी व्यक्त केली. शाहिदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी का करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. जर आपण सुरूवातीला चांगली गोलंदाजी केली असती तर चित्र वेगळे असते. शाहीनने देखील नसीम सारखी गोलंदाजी करणे गरजेचे होते. मात्र त्याची लाईन लेंथ चांगली नव्हती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT