Shahid Afridi Most Sixes In ODI World Record Rohit Sharma Jos Buttler Can Break esakal
क्रीडा

आफ्रिदीचं सर्वाधिक षटकारांच वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडणार, रोहित की...

अनिरुद्ध संकपाळ

शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) हा त्याच्या काळातला एक धडाकेबाज फलंदाज होता. वनडे क्रिकेट ज्यावेळी ऐन भरात होतं त्यावेळी त्याने आपल्या षटकारांनी क्रिकेट रसिकांना वेड लावलं होते. वनडे मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचे रेकॉर्ड (Most Sixes In ODI World Record) देखील शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने वनडेमध्ये सर्वाधिक 351 षटकार मारले आहेत. त्याच्या खालोखाल असलेल्या सनथ जयसूर्या आणि आफ्रिदीमध्ये तब्बल 80 षटकारांचा गॅप आहे. जयसूर्याने वनडेमध्ये 270 षटकार मारले आहेत. शाहिद आफ्रिदी वयाच्या 16 व्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. त्याला त्याचा फायदा झाला. मात्र आताच्या घडीला असे दोन फलंदाज आहेत जे आफ्रिदीचे वनडेत सर्वाधिक षटकार मराण्याचे रेकॉर्ड मोडू शकतात.

1) रोहित शर्मा (Rohit Sharma)

रोहित शर्मा हा सध्याच्या घडीचा जगातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. तो आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी जगभर विख्यात आहे. तो चेंडू लिलया मैदानाबाहेर मारतो. रोहित शर्माने वनडेमध्ये आतापर्यंत 250 षटकार मारले आहेत. तो शाहिद आफ्रिदीच्या वर्ल्ड रेकॉर्डपासून 101 षटकार दूर आहे. रोहित शर्मा सलामीला येत जास्तीजास्त षटके खेळण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या इनिंग खेळण्याचे कसब तो जाणतो. त्यामुळे रोहित शर्मा शाहिद आफ्रिदीचे वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याची जास्त शक्यता आहे.

2 ) जॉस बटलर (Jos Butter)

जॉस बटलरला नुकतेच इंग्लंडच्या वनडे संघाचा कर्णधार करण्यात आले आहे. तो मर्यादित षटकाच्या क्रिकेटमधील एक उत्तम फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 144 वनडे षटकार मारले आहेत. तो सध्याचा वनडे आणि टी 20 मधील एक सर्वोत्तम फलंदाज आहे. जरी त्याच्या कर्णधारपदाच्या इनिंगची सुरूवात फार काही चांगली झाली नसली तरी तो एक असा फलंदाज आहे जो शाहिद आफ्रिदीचे सर्वाधिक वनडे षटकार मारण्याचे रेकॉर्ड तोडण्याची क्षमता नक्तीच त्याच्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT