Shahid Afridi On Shaheen Afridi T20 Captaincy esakal
क्रीडा

Shahid Afridi : काय सांगाता सासरेबुवांनाच जावई 'कर्णधार' झालेला नकोय; शाहीद अफ्रिदी म्हणतो मी सांगितलं होत...

अनिरुद्ध संकपाळ

Shahid Afridi On Shaheen Afridi T20 Captaincy : पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात सध्या नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहे. बाबर आझमने पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर पीसीबीने टी 20 आणि कसोटी संघाचा कर्णधार बदलला. शान मसूद हा कसोटीचा तर शाहीन अफ्रिदी हा टी 20 चा कर्णधार झाला आहे. शाहीन अफ्रिकी कर्णधार झाल्यानंतर सासरेबुवांची कृपेमुळे हे घडल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

मात्र आता यावर शाहीद अफ्रिदीने स्पष्टीकरण दिलं आहे. अफ्रिदी समा टीव्हीवर बोलताना म्हणाला की, 'मी सांगतो होतो की आताच कर्णधार बदलण्याची गरज नाही. पंतप्रधानांनी मला विचारलं होतं. आम्ही क्रिकेट आणि कॅप्टन्सीबाबत बोललो. मी माझे मत त्यांना सांगितलं की बाबरला आताच बदलणं योग्य नाही.'

'मला वाटलं की त्याला कसोटीच्या कर्णधारपदी कायम ठेवतील. जर तुम्हाला मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारांचा कर्णधार बदलायचा होता तर माझ्या मते मोहम्मद रिझवान हा योग्य पर्याय होता. मी हे गेल्या अनेक काळापासून सांगतोय.'

शाहीद अफ्रिदी पुढं म्हणाला की, 'मी पीसीबी चेअरमन यांच्याशी देखील बोललो. मी सांगितलं होतं की बाबर आझमला कसोटीचा कर्णधार कायम ठेवा. मी त्यांना वनडे आणि टी 20 चा कर्णधार मोहम्मद रिझवानला करा असं देखील सांगितलं होते. त्याने मुल्तान सुल्तान संघाचे देखील कर्णधारपद भुषवलं आहे. त्याला संघाला कसं पुढं घेऊन जायचं ते माहिती आहे. मी सांगू इच्छितो की हा निर्णय चेअरमन आणि मोहम्मद हाफिज यांचा आहे.'

'शाहीन टी 20 संघाचा कर्णधार होण्याबद्दल बोलायचं झालं तर मी या अशा निर्णयांमध्ये सहभाग घेत नाही. लोकं म्हणतील की मी शाहीनसाठी लॉबिंग करतोय. मला या अशा भानगडीत पडायचंच नाही. जर तसं असतं तर मी चेअरमनवर टीकाच केली नसती. मी आज पुन्हा सांगतोय की माझा शाहीनच्या कॅप्टन्सीला पाठिंबा नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT