shahid afridi gautam gambhir harbhajan singh
shahid afridi gautam gambhir harbhajan singh 
क्रीडा

IND vs PAK : आफ्रिदीची LIVE शोमध्ये गंभीरवर चिखलफेक; भज्जीच्या प्रतिक्रियेने चाहते संतापले

Kiran Mahanavar

India Vs Pakistan : टीम इंडियाने आशिया कप 2022 मध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयात हार्दिक पांड्याने केलेल्या शानदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. पण या सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो LIVE टीव्ही शोमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरची खिल्ली उडवताना दिसला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हरभजन सिंगही त्याच्या या कृतीवर हसताना होता. हे पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही चाहत्यांचा राग उफाळून आला.

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातील शब्दयुद्ध खूप जुने आहे. आफ्रिदी आणि गंभीर 2007 मध्ये कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भिडले होते. या घटनेनंतर गंभीर आणि आफ्रिदी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांना टोमणे मारताना दिसले आहेत. क्रिकेट असो की राजकीय, दोघे एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भारतातील एका टीव्ही चॅनलशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की, मला भारतातील कोणत्याही खेळाडूशी भांडणे आवडत नाही. ट्विटरवर गौतम गंभीरसोबत अनेकदा वाद होत असतात. गौतम गंभीर हा असा माणूस आहे जो टीम इंडियाच्या कोणात्या खेळाडूला आवडत नाही.

ज्या शोमध्ये शाहिद आफ्रिदीने हे वक्तव्य केले त्या शोमध्ये भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग देखील उपस्थित होता. शाहिद आफ्रिदीचे बोलणे ऐकून हरभजननेही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तर तोही हसायला लागला. भज्जीची ही प्रतिक्रिया भारतीयांना आवडली नाही. सोशल मीडियावर हरभजनवर टीका होत असून चाहते त्याच्यावर नाराज आहेत. भारतीय चाहत्यांकडूनही अनेक ट्विट करण्यात आले होते ज्यात त्यांनी आफ्रिदीने गंभीरवर केलेल्या टीकेनंतर हरभजन हसल्याबद्दल निराशा व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT