Shahid Afridi Sister Dead 
क्रीडा

Shahid Afridi : वर्ल्ड कपदरम्यान शाहिद आफ्रिदीच्या बहिणीचे निधन, कोसळला दुःखाचा डोंगर

Kiran Mahanavar

Shahid Afridi Sister Dead : पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या बहिणीचे निधन झाले आहे. आफ्रिदीने आपल्या बहिणीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्याची बहीण बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

शाहिद आफ्रिदीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शाहिद आफ्रिदीने सोमवारी ट्विट करत लिहिले होते की, मी लवकरच परत येत आहे. माझी बहीण सध्या तिच्या आयुष्यासाठी लढत आहे. मी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. अल्लाह तिला लवकरच बरे करेल. शाहिद आफ्रिदीच्या या ट्विटनंतर काही तासांनी त्याच्या बहिणीच्या मृत्यूची बातमीही समोर आली.

बहिणीच्या मृत्यूनंतर शाहिद आफ्रिदीने 17 ऑक्टोबरला आणखी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले की, आम्ही सर्व अल्लाहचे सेवक आहोत, जड अंतःकरणाने मी तुम्हाला कळवत आहोत की आमच्या लाडक्या बहिणीचे निधन झाले आहे. 17 ऑक्टोबरला तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. शाहिद आफ्रिदीच्या या पोस्टनंतर क्रिकेट चाहते सोशल मीडियावर आफ्रिदीच्या बहिणीला श्रद्धांजली वाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! वाघोलीत आईने ११ वर्षीय मुलाची गळा चिरून केली हत्या, १३ वर्षांची लेक हल्यात जखमी; काय घडलं?

Latest Marathi News Live Update : मालाड पश्चिमेकडील मालवणीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग

Shocking News : पिस्तूल हातात घेऊन बनवत होता रील, अचानक ट्रिगर दबला अन् पत्नीला लागली गोळी... धक्कादायक घटनेने खळबळ

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, दोन जखमी, चालकाचा डोळा लागला अन् तेवढ्यात कार...

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी! विशालची बाथरुममधून 'ती' वस्तू हरवली, थेट कॅप्टनचं जेवण होणार बंद?

SCROLL FOR NEXT