Shahid Afridi esakal
क्रीडा

विराट - गांगुली वादात शाहिद आफ्रिदीने नाक खुपसले

शाहिद आफ्रिदी म्हणतो क्रिकेट बोर्ड वडीलकीची भुमिका बजावते

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट (Shahid Afridi) कोहली कोहली (Virat Kohli) आणि सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांच्यात झालेल्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत रोहित शर्माकडे दिल्यानंतर हा वाद उद्भवला होता. यावर शाहीद आफ्रिदी म्हणतो की, या संपूर्ण प्रकरण बीसीसीआयने योग्य पद्धतीने हाताळले पाहिजे होते. या प्रकरणात योग्य प्रकारे एकमेकांशी संवाद साधण्यात आला नाही.

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी पत्रकार परिषदेत टी २० चे नेतृत्व सोडण्याबाबत वक्तव्य केले होते. हे वक्तव्य बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या वक्तव्याच्या विरुद्ध होते. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तृळात खळबळ उडाली होती.

यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, 'हे प्रकरण अजून चांगल्या प्रकारे हाताळता आले असते. मला कायम वाटते की एखाद्या क्रिकेट बोर्डाची भुमिका फार महत्वाची आहे. ते वडीलकीची भुमिका बजावत असात. निवड समितीचे जे काही भविष्यातील प्लॅन्स असतील ते खेळाडूंपर्यंत व्यवस्थित पोहचवले गेले पाहिजेत. आमची भविष्यातील योजना अशी आहे तुझी योजना काय आहे? आम्ही क्रिकेट बोर्ड म्हणून या गोष्टी करणार आहोत. आम्हाला यात फायदा दिसतो.'

आफ्रिदी (Shahid Afridi) पुढे म्हणाला, 'तुम्ही जर प्रेसमधून बोलू लागला तर समस्या होतील. जर तुम्ही एकमेकांसमोर बसून बोलला तर समस्येवर तोडगा निघू शकतो. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीतून वाद निर्माण करायचा असेल तर समस्या सुटणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT