shahid afridi-wanted-to-replace-babar-azam-as-captain-pakistan-cricket-board-najam-seth-reveals  
क्रीडा

Pakistan Cricket : जावयासाठी बाबर आझमला डच्चू देणार होता शाहिद आफ्रिदी, PCB अध्यक्षांचा मोठा खुलासा

शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवायचे होते मात्र...

Kiran Mahanavar

Pakistan Cricket Board : शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील अंतरिम निवड समितीला सुरुवातीला बाबर आझमला पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून हटवायचे होते. मात्र, नंतर निवड समितीने आपला निर्णय बदलून बाबर आझमला कर्णधारपदी कायम ठेवले.

शाहिद आफ्रिदीने या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतून अंतरिम निवड समितीची जबाबदारी स्वीकारली होती, या मालिकेनंतरच त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बाबर आझम व्यतिरिक्त जुन्या अंतरिम निवड समितीमध्ये अब्दुल रज्जाक, इफ्तिखार अंजुम आणि हारून रशीद होते.

शाहिद आफ्रिदीला ही जबाबदारी मिळाल्याच्या काही महिन्यांपूर्वी नजम सेठी यांनीही पीसीबी प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली होती. वाहिद खानच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना नजम सेठी म्हणाले, “आम्ही पदभार स्वीकारला तेव्हा आम्ही अंतरिम निवड समिती स्थापन केली. निवड समितीवर येण्यापूर्वी त्याने आम्हाला सांगितले की संघात काही बदल करावे लागतील आणि बाबर आझमच्या जागी कर्णधारपदाची वेळ आली आहे.

नजम सेठी पुढे म्हणाले की, मी वारंवार सांगतो की असे निर्णय मी स्वत: घेत नाही, उलट मला त्या लोकांचा सल्ला घ्यावा लागतो. सेठी पुढे म्हणाले की जेव्हा ते लोक अंतरिम निवड समितीचा भाग बनले तेव्हा त्यांनी आपला निर्णय बदलला आणि सांगितले की बाबरला कर्णधार म्हणून बदलण्याची गरज नाही, मी त्यांना असेही सांगितले की तुमचा निर्णय बदलण्याचा पूर्ण अधिकार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या होम सीरिजनंतर शाहिद आफ्रिदीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. समितीच्या बैठकांना वेळ नसणे हे त्यांच्या राजीनाम्याचे कारण होते. आफ्रिदीच्या राजीनाम्यानंतर हारून रशीद यांची पीसीबीच्या राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

अंतरिम मुख्य निवडकर्ता होण्यापूर्वी शाहिद आफ्रिदीने बाबर आझमवर अनेक वेळा जाहीरपणे टीका केली होती. त्याने बाबरच्या स्ट्राईक रेटवर तसेच T20 विश्वचषकादरम्यान त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र पीसीबीमध्ये आल्यानंतर शाहिद आफ्रिदीचा सूर बदलला होता.

अफगाणिस्तानविरुद्ध यूएईमध्ये नुकत्याच झालेल्या 3 टी-20 मालिकेसाठी बाबर आझमसह अनेक वरिष्ठ खेळाडूंचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आलेला नाही. या मालिकेत शादाब खानच्या नेतृत्वाखालील संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तानने प्रथमच पाकिस्तानला कोणत्याही फॉरमॅटमध्ये पराभूत केले नाही तर मालिकाही 2-1 अशी जिंकली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बाबर आझमचे कर्णधार म्हणून संघात पुनरागमन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT