Shahu Chhatrapati KSA League Football Tournament esakal
क्रीडा

Football Tournament : फुटबॉल सामन्यात प्रथमच होणार 'टायब्रेकर'चा अवलंब; KSA लीगचे वेळापत्रक जाहीर

या हंगामात कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनने खेळाचे नियम व आचारसंहिता तयार केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

या वर्षीपासून प्रथमच सीनियर गटामध्ये टायब्रेकरच्या नियमाचा अवलंब होणार आहे.

कोल्हापूर : येथील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (Kolhapur Sports Association) आयोजित श्री शाहू छत्रपती केएसए साखळी फुटबॉल स्पर्धेत (Football Tournament) प्रथमच सामना बरोबरीत राहिला, तर सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये घेतला जाणार आहे. पंधरा डिसेंबरपासून स्पर्धेस प्रारंभ होणार असून, याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

आता स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. झुंजार क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ (ब) या संघांमध्ये पंधरा डिसेंबरला दुपारी दीड वाजता पहिला सामना होणार आहे. दुसरा सामना दुपारी चार वाजता शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ या संघात होणार आहे.

या हंगामात कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनने खेळाचे नियम व आचारसंहिता तयार केली असून, ती सर्व संघ प्रतिनिधींना दिली आहे. वरिष्ठ साखळी स्पर्धा सीनियर सुपर एठ (वरचा गट) आणि सीनियर एट (खालचा गट) या गटांत होणार आहे. सीनियर सुपर एट गटामध्ये विजयी संघाला तीन गुण, पराभूत संघाला शून्य गुण, तर बरोबरी राखणाऱ्या संघाला एक गुण देण्यात येणार आहे.

मात्र, सिनियर एठ (खालचा गट) गटामध्ये सामना बरोबरीत राहिला, तर सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लागणार आहे आणि पराभूत संघाला शून्य गुण मिळणार आहेत. या वर्षीपासून प्रथमच सीनियर गटामध्ये टायब्रेकरच्या नियमाचा अवलंब होणार आहे. या गटात झुंजार क्लब, बीजीएम स्पोर्टस्‌, संध्यामठ तरुण मंडळ, उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ (ब), सोल्जर ग्रुप, कोल्हापूर पोलिस, सम्राट नगर स्पोर्टस् या संघांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका संघातील वनडे सामना दिल्लीतून अचानक हलवला, आता कोणत्या मैदानात होणार मॅच?

Satara News: महामार्गावरील वाहतूक काेंडी लांबणारच! शेतकरी संघटनांचा कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टीमेटम... अन्यथा जिल्हा बंद

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्याचे विशाखा नक्षत्रात गोचर; तुला ते मीन राशीच्या जातकांसाठी कशी असेल स्थिती?  जाणून घ्या राशिभविष्य

मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT