shakib al hasan  sakal
क्रीडा

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी शकीबची डायलॉगबाजी, बदला घेणार का ?

सामन्यापूर्वी शकीब अल हसनच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Kiran Mahanavar

Shakib al Hasan on India vs Bangladesh : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडिया आज बांगलादेश विरुद्ध चौथा सामना अॅडलेडमध्ये खेळणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसनने असे वक्तव्य केले आहे ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. शाकिब अल हसनने आपली टीम टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी आली नसल्याचं म्हटलं आहे.

सामन्याआधी शाकिब अल हसन म्हणाला की, आम्ही इथे टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलो नाही. टीम इंडिया इथे जिंकण्यासाठी आली आहे. बांगलादेश भारताला पराभूत करून पलट पार करणार आहे. एकीकडे जिथे सर्व संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी खेळत आहेत, त्याच दरम्यान शाकिबच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 मध्ये टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने देखील 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. ग्रुप 2 मध्ये बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत बांगलादेशचा संघही उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करू शकतो. मात्र, टीम इंडियाला पराभूत करणे बांगलादेशसाठी सोपे असणार नाही.

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 11 सामने झाले आहे. टीम इंडियाने यापैकी 10 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने फक्त 1 सामना जिंकला आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, तो हिंसाचार...

Sourav Ganguly: चांगल्या खेळपट्टीवर खेळा अन् शमी जरा विश्वास ठेवा, गांगुलीने गौतम गंभीर स्पष्ट शब्दात सुनावलं

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Mumbai News: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दहा पदरी होणार; चार नव्या लेनसाठी राज्य सरकारचं नियोजन काय?

Stock Market Closing : बाजारातील तेजी सलग सहाव्या दिवशीही कायम; निफ्टीने ओलांडला 26000 चा टप्पा; कोणते शेअर्स फायद्यात?

SCROLL FOR NEXT